Crime News Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: विवस्त्र करुन तरुणाला बेदम मारहाण, तो विनवणी करत राहिला...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये एका तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये एका तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यावर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली.

व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. व्हिडिओमध्ये पीडित तरुणाला अर्धनग्न अवस्थेत झाडाला (Trees) दोरीने बांधलेले दिसत आहे.

तो हात जोडून लोकांकडे विनवणी करत आहे, पण त्याचे कोणीच ऐकत नाही. यावेळी लोक त्याला शिवीगाळ करताना दिसले. लोकांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दरम्यान, तरुणाला मारहाणीचा व्हायरल झालेला व्हिडिओ प्रतापगडच्या पट्टी कोतवाली येथील बहुटा गावातील आहे. मध्यरात्री एका व्यक्तीच्या घराची भिंत पाडण्याचा प्रयत्न करत असताना गावातील लोकांनी या तरुणाला पकडल्याचे बोलले जात आहे.

यावेळी गावकऱ्यांनी त्याला धावत पकडले. आणि चोर समजून त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान तरुणाचा शर्ट फाटला. तो अर्धनग्न झाला. त्यानंतर लोकांनी त्याला दोरीने झाडाला बांधले.

दुसरीकडे, व्हायरल झालेला व्हिडिओ जुना असला तरी पोलीस त्याचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 13 ऑगस्टची आहे. पीडित तरुण या गावात आपल्या नातेवाईकाच्या घरी वारंवार येत असे. त्याच गावातील एका तरुणीसोबतही त्याचे प्रेमसंबंध होते.

रात्रभर तरुणाला मारहाण केली

तसेच, तरुणाला जवळपास रात्रभर गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. मात्र या जमावामधील एकानेही पोलिसांना माहिती दिली नाही. सकाळनंतर झाडाला बांधलेल्या तरुणाची सुटका करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाबाबत पूर्व पोलीस अधीक्षक विद्यासागर मिश्रा यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत स्थानिक पोलीस (Police) तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT