Noida Supernova Society 43rd Floor Suicide: दिल्लीला लागून असलेल्या नोएडामधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली. नोएडाच्या सेक्टर-94 मधील सुप्रसिद्ध सुपरनोव्हा सोसायटीत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या सोसायटीतील 'एस्पायर टॉवर'च्या तब्बल 43व्या मजल्यावरुन खाली उडी मारुन एका तरुणाने आपले जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, या मृत तरुणाची ओळख संभव जैन अशी पटली असून, त्याने आत्महत्येच्या अवघ्या एक दिवस आधीच या इमारतीत राहण्यासाठी प्लॅट घेतला होता.
आज (3 ऑक्टोबर) सकाळी या इमारतीच्या बाल्कनीच्या रेलिंगला एक तरुण लटकलेला खालून जाणाऱ्या लोकांना दिसला. तो खाली पडण्याच्या तयारीत असतानाच खाली जमलेले लोक त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करु लागले. काही समजण्याच्या आतच त्या तरुणाने 43व्या मजल्यावरुन खाली झेप घेतली. हा भयानक प्रकार डोळ्यांसमोर घडल्याने खाली असलेल्या लोकांमध्ये एकच घबराट पसरली. विशेष म्हणजे, सुपरनोव्हा ही इमारत उत्तर प्रदेशातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते.
दरम्यान, घटनास्थळी तात्काळ पोलीस (Police) पथक दाखल झाले. पोलिसांनी लगेच पीडिताचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला. प्राथमिक तपासात असे समोर आले की, संभव जैन हा सुपरनोव्हा येथील एअरबीएनबी मध्ये थांबला होता आणि तो घटनेच्या एक दिवस आधीच येथे आला होता. दरम्यान, या घटनेचा एक अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यातून आत्महत्येची भीषणता दिसून येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून, हा टोकाचा निर्णय घेण्यामागे कौटुंबिक कलह, नैराश्य की आर्थिक तंगी कारणीभूत होती, याचा शोध घेतला जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संभव जैन याने नेमकी कोणती हालचाल केली आणि तो कोणाच्या संपर्कात होता, हे तपासण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज कसून तपासत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे नोएडाच्या पॉश सोसायटीत मोठी हळहळ व्यक्त होत असून, तरुणाच्या अशा टोकाच्या पावलाविषयी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.