Mahrajganj Wife Kills Husband Dainik Gomantak
देश

"ती" बनली काळ! झोपलेल्या नवऱ्याला घरात कोंडलं अन् बाहेरुन टाळं लावून अख्खं घरच दिलं पेटवून; बायकोनं केली संसाराची राखरांगोळी

Mahrajganj Wife Kills Husband: उत्तर प्रदेशातील महराजगंज जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील महराजगंज जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली. येथील एका 60 वर्षीय महिलेने आपल्या 65 वर्षीय पतीला झोपेत असताना घरात कोंडले आणि घराला आग लावून दिली. इतकेच नाही तर पतीला बाहेर पडता येऊ नये म्हणून तिने घराला बाहेरुन कुलूप लावले आणि स्वतः घटनास्थळावरुन पळ काढला. या भीषण आगीत होरपळून पतीचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, ही थरारक घटना श्यामदेउरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बासपार कोठी टोला पिपरा गावात घडली. मृत व्यक्तीचे नाव रामपत असून ते घरात गाढ झोपेत होते. त्यांच्या पत्नीने, सुमित्राने घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. घरातून धूर निघत असल्याचे पाहून गावकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना (Police) पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचे कुलूप तोडले असता, आत रामपत यांचा पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळून आला.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कडाक्याचे भांडण सुरु होते. आरोपी पत्नी सुमित्राने यापूर्वीही रामपत यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मंगळवारी तिने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या. जेव्हा रामपत गाढ झोपेत होते, तेव्हा तिने घराला आग लावली आणि त्यांना मरण्यासाठी सोडून ती पळून गेली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपत यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून आरोपी सुमित्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस पथके फरार सुमित्राचा शोध घेत असून या हत्येमागे आणखी काही कारणे आहेत का, याचा तपास पोलीस निरीक्षक अभिषेक सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT