Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Multiple-Vehicle Accident Reported on Atal Setu: अटल सेतूवर मंगळवारी (ता. ५ मे) एक भीषण साखळी अपघात झाला. या अपघातात तब्बल सात वाहने एकमेकांना धडकली, ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती.
Multiple-Vehicle Accident Reported on Atal Setu
Multiple-Vehicle Accident Reported on Atal SetuDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अटल सेतूवर मंगळवारी (ता. ५ मे) एक भीषण साखळी अपघात झाला. या अपघातात तब्बल सात वाहने एकमेकांना धडकली, ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र, गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या अपघातामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून जात असताना एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. समोर आलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर ऑईल सांडलेले असल्यामुळे गाडी अचानक घसरली. पाठीमागून येणाऱ्या इतर वाहनचालकांना सावरून घेण्याची संधी न मिळाल्याने एकामागोमाग एक सात गाड्या एकमेकांवर आदळल्या.

Multiple-Vehicle Accident Reported on Atal Setu
Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

वाहतुकीचा मोठा खोळंबा

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या सात गाड्यांनी पुलाचा बराचसा भाग व्यापला होता, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

Multiple-Vehicle Accident Reported on Atal Setu
Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

या अपघाताचे स्वरूप पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, परंतु एअरबॅग्स आणि सीटबेल्टमुळे प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही. अपघातातील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासनाने आता रत्यावर ऑईल नेमके कसे सांडले, याचा तपास सुरू केला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com