Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Goa NH66 Highway: पेडणे तालुक्यातील उगवे गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६६मुळे स्थानिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
daily life affected by highway construction Goa
daily life affected by highway construction GoaDainiak Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पेडणे तालुक्यातील उगवे गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६६मुळे स्थानिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उभारलेल्या या महामार्गामुळे सोयीपेक्षा अडचणीच अधिक निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, अनेकांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही. रस्त्यामुळे गाव दोन भागांत विभागले गेले असून, एका बाजूला घरे तर दुसऱ्या बाजूला शेती असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो.

daily life affected by highway construction Goa
Bhoma Road: "..अन्‍यथा पंचायतीसमोरच उपोषण करु"! भोम ग्रामसभेत पुन्‍हा ‘बगलमार्ग' गाजला; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

आश्वासने नकोत!

ओव्हरब्रिज, अंडरपास किंवा सुरक्षित क्रॉसिंगची सुविधा नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून ‘आता आश्वासने नकोत, प्रत्यक्ष काम हवे,’ अशी ठाम भूमिका घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com