Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

BicholimCase: येथील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणी संशयित कारचालक नीलू गावकर (रा. शिरगाव) याला डिचोली पोलिसांनी अटक केली आहे.
Bicholim Hit And Run Case
Bicholim Hit And Run CaseDainiak Gomantak
Published on
Updated on

डिचोली: येथील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणी संशयित कारचालक नीलू गावकर (रा. शिरगाव) याला डिचोली पोलिसांनी अटक केली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेली स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे. हा अपघात काल रविवारी सायंकाळी मुस्लिमवाडा-डिचोली येथे घडला. मल्लेश तलवार हा स्‍कूटरवरून (जीए-04-आर-8231) जात असताना, इंडियन ओव्हरसीज बँकेजवळ मागून आलेल्या स्विफ्ट कारने (जीए-04-एच-1654) त्याला जोरदार धडक दिली.

या अपघातात मल्लेश जखमी झाला असून त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारचा शोध घेऊन अखेर संशयिताला अटक करण्यात आली. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर, उपअधीक्षक विश्वेश कर्पे व निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्चना शर्मा यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Bicholim Hit And Run Case
Goa Crime: लाथाबुक्क्यांच्या मारहाणीत बरगड्या मोडल्या, कुचेलीत बारमधील किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट; सुभाष नाईक यांचा खून

अपघात कसा घडला?

मल्लेश तलवार हा स्कूटरवरून जात असताना मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी मागून आलेल्या कारने त्याच्या स्कुटरला धडक दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेज तपासली. त्यातून कारचा माग काढून संशयित नीलू गावकर याला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com