Accident News Dainik Gomantak
देश

Accident News: भीषण अपघात! देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 11 जणांचा मृत्यू VIDEO

Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात रविवारी (3 ऑगस्ट) एक भीषण अपघात (Accident) झाला, ज्यात 11 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Manish Jadhav

Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात रविवारी (3 ऑगस्ट) एक भीषण अपघात (Accident) झाला, ज्यामध्ये 11 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व लोक बोलेरो गाडीतून पृथ्वीनाथ मंदिरात पूजा करण्यासाठी जात होते. गाडीमध्ये एकूण 15 लोक होते.

गाडी कॅनॉलमध्ये कोसळली

दरम्यान, हा अपघात इटियाथोक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरो (Bolero) गाडी थेट कॅनॉलमध्ये कोसळली. या दुर्घटनेत गाडीत असलेल्या 15 पैकी 11 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी (DM) आणि पोलीस अधीक्षक (SP) यांच्यासह प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी धाव घेतली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले दुःख

दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत शोक व्यक्त केला. त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Platform) पोस्ट करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, "गोंडा जिल्ह्यात झालेली ही दुर्घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबासोबत आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करुन योग्य उपचार देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत."

घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे गोंडा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Satyapal Malik: "गोवेकरांची जगण्याची पद्धतच अनोखी" गोव्याचं कौतुक करताना थकत नव्हते सत्यपाल मलिक

5 बेडरूम, प्रायव्हेट पूल आणि सी व्ह्यू... अजय-काजोलचा गोव्यातला आलिशान व्हिला पाहिलात का? एका रात्रीसाठी मोजावे लागतील 'तब्बल' एवढे

जिवंत मासा गिळला; गोव्यात सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू Watch Video

ST Reservation Bill Passed: गोव्यातील एसटी समाजासाठी आनंदाची बातमी; राजकीय आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

SCROLL FOR NEXT