Uttar Pradesh crime wife kills husband electric shock poison Dainik Gomantak
देश

Crime News: आधी शॉक दिला, मग पाजलं विष! अनैतिक संबंधाआड येणाऱ्या नवऱ्याचा बायकोनं काढला काटा; सख्खी बहीण अन् तिचा बॉयफ्रेंडही कटात सामील

Uttar Pradesh crime wife kills husband electric shock poison: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कुंदनपूर येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय पवन ठाकूर याचा विवाह ६ वर्षांपूर्वी संभल येथील आंचल नावाच्या तरुणीशी झाला होता. त्यांना दोन वर्षांची एक चिमुरडी मुलगीही आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आंचलचे तिच्याच नात्यातील अंकित नावाच्या एका तरुणासोबत सूत जमले होते. अंकित हा नात्याने पवनचा पुतण्या लागत होता. या अनैतिक संबंधांची माहिती जेव्हा पती पवनला मिळाली, तेव्हा त्याने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला आणि या संबंधांना तीव्र विरोध केला.

आपले प्रेमसंबंध संपवण्याऐवजी आंचलने पतीचाच काटा काढण्याचा भयंकर निर्णय घेतला. तिने तिच्या माहेरी जाऊन या हत्येचा संपूर्ण कट रचला. या गुन्ह्यात तिने तिचा प्रियकर अंकित, तिची सख्खी बहीण शिखा आणि शिखाचा बॉयफ्रेंड अजय दिवाकर या तिघांनाही सामील करून घेतले. कटानुसार, आंचलने पती पवनला फोन करून आपल्या माहेरी बोलावून घेतले. पवन तिथे पोहोचताच या चारही आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली.

विजेचे धक्के आणि बळजबरीने विष पाजलं

अत्यंत क्रूरतेची सीमा गाठत आरोपींनी आधी पवनला जिवंतपणी विजेचे तीव्र धक्के (Electric Shocks) दिले. तो वेदनेने विव्हळत असतानाही आरोपींना दया आली नाही. विजेचे धक्के दिल्यानंतर त्यांनी पवनला बळजबरीने तोंड उघडून अत्यंत घातक विषारी पदार्थ पाजला.

विष शरीरात पसरल्यामुळे पवनचा जागीच तडफडून मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी मृत्यू नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मृतदेह तत्काळ शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड केले बिंग; ४ आरोपी गजाआड

मुरादाबादचे एसएसपी (SSP) सतपाल अंतिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर या संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा झाला. पवनच्या शरीरावर वेगवेगळ्या ९ ठिकाणी गंभीर जखमांच्या आणि विजेच्या धक्क्यांच्या खुणा आढळून आल्या, तसेच त्याच्या पोटात विष असल्याचे स्पष्ट झाले.

या अहवालाच्या आधारे पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत मुख्य आरोपी पत्नी आंचल, प्रियकर अंकित, बहीण शिखा आणि अजय दिवाकर या चौघांनाही अटक केली आहे. या सर्वांचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (हत्या) अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT