Crime News Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: हुंड्यासाठी विवाहितेला जाळले; पळून जाणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी

Uttar Pradesh Crime News: ग्रेटर नोएडा येथील दादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसामध्ये हुंड्याच्या मागणीवरुन एका विवाहितेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime News: ग्रेटर नोएडा येथील दादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसामध्ये हुंड्याच्या मागणीवरुन एका विवाहितेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याचदरम्यान पत्नी निक्कीच्या निर्घृण हत्येचा मुख्य आरोपी विपिन याला शनिवारी (23 ऑगस्ट) पोलिसांनी ताब्यात घेतले असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात तो जखमी झाला. ही घटना ग्रेटर नोएडा येथील सिरसा चौकाजवळ घडली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विपिन हा पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला.

आईला जाळताना 6 वर्षांच्या मुलाने पाहिले

दरम्यान, निक्कीचा तिच्या पती आणि सासरच्या मंडळींनी छळ करुन तिचा लहान मुलगा आणि बहिणीसमोर तिला जाळले. ही घटना अत्यंत क्रूर आणि अमानवीय होती. इंडिया टुडे शी बोलताना निक्कीच्या 6 वर्षांच्या मुलाने त्या भीषण घटनेबाबत सांगितले. तो म्हणाला की, “त्यांनी माझ्या आईवर काहीतरी ओतले, मग तिला थप्पड मारली आणि लाइटरने आग लावली.” हे सांगताना त्या निरागस मुलाच्या डोळ्यातील भीती स्पष्ट दिसत होती. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत, ज्यात निक्कीला मारहाण केली जात असल्याचे आणि केसांना धरुन फरफटत नेल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती भाजलेल्या अवस्थेत जिन्यावरुन लंगडत उतरतानाही दिसते.

पोलिसांच्या गोळीबारात आरोपी जखमी

घटनेनंतर पोलिसांनी आरोपी विपिनला अटक केली होती. शनिवारी, ज्या थिनरच्या बाटलीचा वापर निक्कीला जाळण्यासाठी केला गेला होता, ती बाटली मिळवण्यासाठी पोलीस त्याला घेऊन जात होते. सिरसा चौकाजवळ आल्यावर आरोपी विपिनने अचानक एका पोलीस अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि पळून जाण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला अनेकवेळा थांबण्याचा इशारा दिला, मात्र तो पळतच राहिला. अखेर, कोणताही पर्याय नसल्यामुळे पोलिसांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. एक गोळी त्याच्या पायाला लागली, ज्यामुळे तो जखमी होऊन खाली पडला. पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

हुंड्यासाठी छळ आणि कुटुंबाची मागणी

निक्कीच्या वडिलांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, निक्कीच्या सासरच्या लोकांनी तिच्याकडे सतत हुंड्याची मागणी केली. “आधी त्यांनी हुंड्यात स्कॉर्पिओ गाडी मागितली, जी आम्ही दिली. त्यानंतर बुलेट बाईकची मागणी केली आणि तीही दिली. तरीही त्यांनी माझ्या मुलीचा छळ करणे थांबवले नाही,” असे निक्कीच्या वडिलांनी सांगितले. प्राथमिक चौकशीमध्ये असेही समोर आले की, निक्कीच्या वडिलांनी नुकतीच एक मर्सिडीज गाडी खरेदी केली होती, ज्यावरही विपिनची नजर होती आणि तो त्या गाडीची मागणी करत होता.

यापूर्वी, निक्कीच्या वडिलांनी कठोर कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. “त्यांनी माझ्या मोठ्या मुलीला मारले आहे. आरोपींना अटक केली पाहिजे. हे योगीजींचे सरकार आहे, आरोपींवर बुलडोझर चालवला पाहिजे. नाहीतर आम्ही उपोषणाला बसू,” असे ते म्हणाले होते.

आरोपी विपिन जखमी झाल्यानंतर निक्कीच्या वडिलांनी पोलिसांच्या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले, “पोलिसांनी योग्य तेच केले आहे. गुन्हेगार नेहमीच पळून जाण्याचा प्रयत्न करतात आणि विपिन एक गुन्हेगारच होता. आमची पोलिसांना विनंती आहे की, या हत्येमध्ये सामील असलेल्या इतर आरोपींनाही लवकरात लवकर पकडावे.” या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंड्यासारख्या सामाजिक कुप्रथांचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT