Jammu-Kashmir  Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: बारामुल्लामध्ये मोठा कट फसला, लष्कर-ए-तैय्यबाचे 3 दहशतवादी गजाआड

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये दहशतवादाचा मोठा कट उधळण्यात आला आहे.

Manish Jadhav

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये दहशतवादाचा मोठा कट उधळण्यात आला आहे. लष्कर-ए-तैय्यबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी आर्म्स एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे पोलीस आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त दलाने दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. तीन दहशतवाद्यांना (Terrorists) अटक करुन त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला.

स्थानिक पोलिसांनी सांगितले की, "बारामुल्लामधील उरी येथे एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला, यामध्ये लष्कर-ए-तैय्यबाच्या 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तात्काळ गुन्हाही दाखल करण्यात आला आहे."

दहशतवाद्यांना पकडण्यात आले

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, बारामुल्ला पोलिस आणि लष्कराच्या 16 शीख लाइट इन्फंट्रीच्या संयुक्त सैन्याने चुरुंडा उरी येथे संयुक्त गस्ती दरम्यान एक संशयित व्यक्ती पाहिली. तो परिसरात फिरत होता.

यादरम्यान पेट्रोलिंग पार्टीला पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले असून त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची ओळख शौकत अली अवान, चुरुंडा, उरी येथील रहिवासी अशी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांची नावे अहमद दीन, रा. चुरुंडा, मोहम्मद सादिक खटाना, रा. चुरुंडा अशी सांगितली.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून दोन ग्रेनेड, एक चायनीज पिस्तूल, एक पिस्तुल मॅगझीन आणि चार जिवंत राऊंड जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पकडलेले आरोपी पाकिस्तानस्थित (Pakistan) दहशतवादी हँडलर्सच्या इशार्‍यावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याच्या सीमापार तस्करीमध्ये सामील असून ते दहशतवादी कारवाया करण्यासाठी लष्करच्या दहशतवाद्यांना शस्त्रे वितरीत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT