Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन जवान शहीद

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले.
Terrorist Attack On Jammu Kashmir
Terrorist Attack On Jammu KashmirDainik Gomantak

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. गुप्तचर माहितीनंतर लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हालान जंगल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरु केली.

गुप्तचर माहितीनंतर लष्कराने शुक्रवारी शोध मोहीम सुरु

लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कुलगाममधील हलानच्या उंचीवर दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी 4 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारी शोध मोहीम सुरु केली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यामध्ये लष्कराचे तीन जवान जखमी झाले, त्यांना उपचारासाठी श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे तिन्ही जवानांचा मृत्यू झाला. चिनार कॉर्प्सने सांगितले की, दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रुपांतर झाले. यानंतर लष्कराच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिले. सध्या उंचावर असलेल्या भागात किती दहशतवादी आहेत याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. या भागात अतिरिक्त फौजा पाठवण्यात आल्या असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com