hazratganj incident
hazratganj incident Dainik Gomantak
देश

लखनौच्या हजरतगंजमध्ये भीषण अपघात, घराची भिंत कोसळून दोन मुलांसह 9 जणांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. हजरतगंज परिसरात भिंत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ती एका घराची भिंत असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत दोन मुलांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी (CM Yogi Adityanath) यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. यासोबतच मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. लखनौमध्ये कालपासून सतत पाऊस पडत आहे. भिंतीचा ढिगारा हटवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. सीएम योगी यांनी स्वत: डीएम आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत.  

घर अतिशय जीर्ण अवस्थेत होते
हजरतगंज परिसरात अनेक जुनी घरे आहेत. हे घर 100 वर्षे जुने सांगितले जात आहे. पावसामुळे घराची संपूर्ण भिंत कोसळली. ज्यामध्ये सुमारे 10 लोक गाडले गेले. या संपूर्ण परिसरात छोट्या-छोट्या गल्ल्या असून त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. कामाला गती देण्याचे आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT