Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: योगी सरकारची मोठी कारवाई, 1,332 कर्मचार्‍यांना कामावरुन टाकले काढून!

Uttar Pradesh CM Yogi Adityanath: शनिवारी उर्जा मंत्री एके शर्मा यांनी कंत्राटी कर्मचारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कामावर परत न आल्यास त्यांना काढून टाकले जाईल असा इशारा दिला होता. डिसमिस केले जाईल.

Manish Jadhav

Uttar Pradesh Government: योगी सरकारने वीज विभागातील कर्मचार्‍यांच्या संपादरम्यान कंत्राटावर काम करणार्‍या 1,332 कर्मचार्‍यांना कामावरुन काढून टाकले आहे.

शनिवारी उर्जा मंत्री एके शर्मा यांनी कंत्राटी कर्मचारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कामावर परत न आल्यास त्यांना काढून टाकले जाईल असा इशारा दिला होता. डिसमिस केले जाईल.

उर्जा मंत्री म्हणाले की, आउटसोर्सिंग कंपन्यांना बडतर्फ कर्मचार्‍यांच्या जागी उद्यापासून नवीन लोकांची नियुक्ती करण्यास सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की, 'विद्युत कर्मचारी संघर्ष समिती'च्या 22 नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात येत असून त्यांच्यावर एस्मा अंतर्गत कारवाई केली जाईल. यातील काही कर्मचाऱ्यांना (Employees) निलंबित करण्यात येत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

गुरुवारपासून वीज कर्मचारी संपावर आहेत

वीज कंपन्यांमधील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांची निवड आणि इतर काही मुद्द्यांवर उत्तर प्रदेशातील वीज कर्मचारी गुरुवारी रात्री 10 वाजल्यापासून तीन दिवस संपावर आहेत.

शनिवारी पत्रकारांशी बोलताना ऊर्जा मंत्री एके शर्मा म्हणाले की, "आज विभागातील 22 कर्मचार्‍यांवर एस्मा अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही जणांना निलंबितही करण्यात आले आहे.

याशिवाय, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अशा 29 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

शर्मा म्हणाले की, “गेल्या 24 तासांत 1,332 कंत्राटी कामगारांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. मी करारावर काम करणार्‍या सर्व कामगारांना विनंती करतो की, त्यांनी चार तासांच्या आत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांच्या ड्युटीसाठी अहवाल द्यावा, तसे न केल्यास त्यांना आज रात्रीच काढून टाकले जाईल.''

असा कडक इशारा ऊर्जामंत्र्यांनी दिला

शर्मा म्हणाले की, आउटसोर्सिंग कंपन्यांना आयटीआय, पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी संस्थांमधून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांची यादी घेऊन त्यांना बडतर्फ कामगारांच्या जागी उद्यापासून शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यास सांगितले आहे.

विद्युत कर्मचारी संयुक्त संघर्ष समितीचे निमंत्रक शैलेंद्र दुबे यांना विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांच्या संख्येबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यात अशा कामगारांची संख्या सुमारे 70 हजार आहे.

दुबे यांनी दावा केला की, “ओब्रा थर्मल पॉवर स्टेशन थांबले आहे. 200 मेगावॅट क्षमतेच्या ओब्रा औष्णिक विद्युत केंद्रातील पाचही युनिट बंद करण्यात आले आहेत. तेथील उत्पादन शून्य आहे.''

दुसरीकडे, वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील काही भागांतील वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. वीज विभागाच्या संपावर असलेल्या कामगारांशी चर्चा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. चर्चेची दारे खुली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT