Uttar Pradesh: भाजी विक्रेत्याचं नशीब फळफळलं, 172 कोटी रुपये चुकून आले खात्यात !

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील भाजी विक्रेत्याच्या बँक खात्यात कोणीतरी 172.81 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत.
Money
Money Dainik Gomantak

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील भाजी विक्रेत्याच्या बँक खात्यात कोणीतरी 172.81 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत.

एवढी रक्कम कोणी ट्रान्सफर केली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. बँक खात्यात एवढी मोठी रक्कम आल्यानंतर भाजीविक्रेता आयकर विभागाच्या निशाण्यावर आला आहे.

आयकर विभागाने भाजी विक्रेत्याला नोटीस देऊन एवढ्या रकमेवर कर भरण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, भाजी विक्रेताही संभ्रमात पडला आहे की, हे सर्व त्याच्यासोबत काय घडत आहे, तर त्याला या पैशांबाबत काहीच माहिती नाही.

भाजी विक्रेत्याच्या खात्यात 172.81 कोटी रुपये आले

विनोद रस्तोगी असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. विनोदचे म्हणणे आहे की, त्याच्या कागदपत्रांच्या सहाय्याने कोणीतरी त्याचे बनावट बँक खाते तयार करुन त्याच्या खात्यात पैसे टाकले आहेत.

तर, विनोद रस्तोगीला वाराणसी (Varanasi) सर्कलच्या आयकर विभागाने नोटीस बजावली असून त्याने युनियन बँक खात्यात 172.81 कोटी रुपयांचा कर भरला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

यानंतर, विनोदने या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आयकर कार्यालय गाठले. ज्या बँक खात्यासाठी त्याला नोटीस पाठवण्यात आली आहे, ते विनोदने उघडलेलेच नाही, असे त्यांना सांगण्यात आले.

Money
Uttar Pradesh: कारखाण्याचे शटर कोसळून एका मजुराचा मृत्‍यू; 8 जण जखमी

आयकर विभाग चौकशी करत आहे

विनोद रस्तोगीला प्राप्तिकर विभागाने शांत राहण्यास सांगितले आहे. विभागाचे म्हणणे आहे की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत.

विभागाने सांगितले की, विनोदला या प्रकरणाची माहिती मिळताच तो थेट पोलिस (Police) ठाण्यात गेला आणि त्याला सायबर सेलमध्ये पाठवण्यात आले.

सध्या हे प्रकरण चर्चेत आहे. ही बातमी जो कोणी ऐकतो किंवा वाचतो त्याला धक्का बसतो. 172.81 कोटी ही मोठी रक्कम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com