Kerala: केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पिनाराई गावात अविवाहितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. याबाबत पंचायतीने चिंता व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने लग्नासाठी वेबसाईट सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वेबसाईट 23 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. जिल्हा नियोजन समितीने पिनाराई पंचायतीच्या 'सय्यम' प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या अंतर्गत, 35 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोणतीही व्यक्ती पंचायतीच्या वेबसाईटवर नोंदणी करुन योग्य जीवनसाथीची निवड करु शकते.
दरम्यान, पिनाराई पंचायतीचे प्रमुख केके राजीवन म्हणाले, "इच्छुक नागरिकांचे लग्नापूर्वी (Marriage) समुपदेशन केले जाईल." त्यांनी पुढे सांगितले की, 'पंचायतीने एक सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये 35 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील अनेक लोक अविवाहित असल्याचे आढळून आले.'
राजीवन पुढे म्हणाले, “ते विविध कारणांमुळे अविवाहित आहेत. काही राजकीय पक्षांनी या समस्येवर मात करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाची मागणी आमच्याकडे केली होती. आता या प्रकल्पांतर्गत, राज्यभरातील इच्छुक लोक वेबसाइटवर नोंदणी करु शकतात. इच्छुक विवाहिताला योग्य वधू किंवा वर मिळाल्यास, पंचायत विवाहपूर्व त्यांचे समुपदेशन करेल.''
राजीवन यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये अशा लोकांकडे त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेणारी व्यक्ती नसते. जिल्हा नियोजन समितीची मान्यता मिळालेला केरळमधील हा बहुधा पहिलाच प्रकल्प आहे. कन्नूर जिल्ह्यातील तालिपरंबाजवळील पट्टुवम ग्रामपंचायतीनेही 'नवमंगलम' नावाचा असाच एक प्रकल्प सुरु केला आहे.
तसेच, पट्टुवम पंचायत प्रमुख पी श्रीमती यांनी माहिती दिली की, पंचायत क्षेत्रातील 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अविवाहित लोकांचा बायोडेटा गोळा करण्यात आला असून या महिन्याच्या अखेरीस नोंदणी पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.