Smriti Irani News Dainik Gomantak
देश

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण, ट्विट करुन दिली माहिती

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी रविवारी सांगितले. कोरोनाची लागण झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी दिल्लीतील राजिंदर नगर येथील पोटनिवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमाला उपस्थित न राहू शकत नसल्याबद्दल नागरिकांची माफीही मागितली. (union minister smriti irani tests positive for covid skips bypoll campaign in delhi)

स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी राजेंद्र नगरच्या नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही याबद्दल माफी मागते. मी राजेंद्र नगरच्या जनतेला आवाहन करतो की, राजेश भाटिया यांना मतदान करा आणि दिल्ली भाजपला (BJP) विजयी करा.'

दरम्यान, राजिंदर नगर पोटनिवडणुकीसाठी 23 जून रोजी मतदान होणार असून 26 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. भाजपने माजी नगरसेवक भाटिया, तर काँग्रेसने माजी नगरसेवक प्रेम लता यांना उमेदवारी दिली आहे. आपचे आमदार राघव चढ्ढा यांना पंजाबमधून (Punjab) राज्यसभेवर उमेदवारी दिल्यानंतर राजिंदर नगर ही जागा रिक्त झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला, पुढील काही दिवस कसं असेल हवामान? वाचा

Anjuna Illegal Hotel: मुख्‍य सचिवांसह 7 प्रतिवादींना नोटिसा, हणजूण येथील बेकायदा हॉटेल प्रकरणी याचिकेची दखल

गोवा आध्‍यात्‍मिक पर्यटनाचे केंद्र व्हावे, क्लब रात्री 12 नंतर बंद करावेत; दुर्घटना कमी होतील- मंत्री विश्‍‍वजीत राणे

Goa Zilla Panchayat: जिल्हा पंचायतीत 'नारीशक्ती'ला प्राधान्य, उत्तर गोवा हे अध्‍यक्ष, तर 'दक्षिण'साठी उपाध्‍यक्षपद महिलांसाठी राखीव

दुर्घटना घडल्‍यास जबाबदार कोण? दायित्त्‍व नक्‍की करा, उच्‍च न्‍यायालयाचे राज्य सरकारला निर्देश; घेतली स्‍वेच्‍छा दखल

SCROLL FOR NEXT