Amit Shah High-Level Meeting On Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर आता विकासाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. खोऱ्यातील दहशतीचा सामना करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार सातत्याने सूचना देत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू-काश्मीरबाबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकारी आणि जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा देखील सहभागी झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, खोऱ्यातील सध्याची सुरक्षा व्यवस्था आणि विकास प्रकल्पांबाबत ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वतीने अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारची माहिती घेण्यात आली. तसेच, अनेक महत्त्वपूर्ण सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीत सीआरपीएफचे डीजी, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव एके मेहता, रॉ प्रमुख आणि एनआयए प्रमुखही उपस्थित होते. ज्यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
बैठकीबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येणाऱ्या विकास कार्यक्रमांवरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये अलिकडच्या काही महिन्यांत हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या आहेत, ज्यात निष्पाप नागरिक आणि सुरक्षा जवानांवर हल्ले आणि सीमेपलीकडून घुसखोरीच्या प्रयत्नांचा समावेश आहे.
सिध्रा भागात चार सशस्त्र दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केल्यानंतर अमित शहांची ही महत्त्वाची बैठक सुरु झाली. 26 जानेवारीपूर्वी पोलिसांना हे मोठे यश मिळाले, त्यात मोठा कट उधळून लावला. पाकिस्तानातून (Pakistan) घुसखोरी केल्यानंतर हे दहशतवादी ट्रकमधून काश्मीरच्या दिशेने जात होते. जम्मू रेंजचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग यांनी सांगितले की, ट्रक चालक मात्र घटनास्थळावरुन पळून गेला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) सुरक्षेचा मुद्दा नेहमीच संवेदनशील राहिला आहे. लष्कराच्या कारवाईनंतरही दहशतवादी सातत्याने घातपात घडवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून खोऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांना दहशतवादी लक्ष्य करत आहेत. या टार्गेट किलिंग अंतर्गत स्थलांतरित मजूर आणि काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले जात आहे. याला सामोरे जाण्यासाठी लष्करातील सर्व बडे अधिकारी आणि तपास यंत्रणा सातत्याने काम करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.