India Vs Pakistan Kashmir Issue: जम्मू-काश्मीर हा आता भारताचा अविभाज्य भाग आहे, हे जगातील भयानक दहशतवादी संघटनांपैकी एक असलेल्या अल कायदाने मान्य केले आहे. कलम 370 हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीरमध्ये यश मिळाल्याचे अल कायदाने मान्य केले आहे. पाकिस्तानी लष्करावर संताप व्यक्त करत अल कायदाने हे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानी सैन्याला भ्याड ठरवून अल कायदाने म्हटले की, 'त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवादी कमी होत आहेत.' यासोबतच भारताला आता काश्मीरमध्ये यश मिळत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अल कायदाने पाक लष्कराला भ्याड संबोधले
AQIS च्या अधिकृत मासिकानुसार भारत सरकारचे काश्मीर धोरण यशस्वी ठरले असून यासाठी अल कायदाने पाकिस्तानवर (Pakistan) टीका केली आहे. पाक आर्मी भ्याड असून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पाठवण्यास सक्षम नसल्याचे या दहशतवादी संघटनेचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने कलम 370 रद्द केले. यानंतर अल कायदाने काश्मीरवर लक्ष केंद्रित केले असून अफगाणिस्तानच्या (Afghanistan) माध्यमातून खोऱ्यात दहशतवादी कायवाया वाढवायच्या आहेत. मात्र भारतीय सुरक्षा दल काश्मीरमधून सातत्याने दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत. या अपयशाला कंटाळून अल कायदाने आता आपला राग पाकिस्तानवर काढला आहे.
लष्कर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे
काश्मीरसाठी तयार झालेल्या दहशतवाद्यांचा खात्मा पाकिस्तानी लष्कर करत आहे, असे मॅगझिनमध्ये म्हटले होते. आपोआप त्याचा भारतालाच फायदा होत आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेनेही कारगिल युद्धात झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानी लष्कराची खिल्ली उडवली आहे. नियतकालिकात अल कायदाने मुस्लिमांना काश्मीरमध्ये एकत्र येऊन पाठिंबा देण्यास सांगितले आहे.
तसेच, अल कायदाने अन्सार गजावत-उल-हिंद ही काश्मीरमधील एकमेव खरी दहशतवादी संघटना असल्याचे वर्णन केले आहे. काश्मीरमधील सुरक्षा दले अल कायदा आणि त्याच्याशी संबंधित दहशतवादी संघटनांचा प्रत्येक नापाक डाव हाणून पाडत आहेत, हे विशेष. गेल्या काही वर्षांत लष्कराने अनेक पाकिस्तानी आणि विदेशी दहशतवाद्यांना ठार केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.