नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रीमंडळाचा (Union Cabinet) विस्तार उद्या संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Elections) डोळ्यासमोर ठेवून हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात असल्याचं बोललं जात आहे. 20 मंत्र्यांना उद्या पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे उद्या पार पडणाऱ्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनामध्ये तयारीही सुरु झाली आहे.
तसेच, नव्या कॅबिनेटमध्ये 25 पेक्षा अधिक OBC मंत्री असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 10 आदिवासी आणि 10 दलित मंत्री असणार आहेत. देशातील सर्व राज्यांना मंत्रीमंडळामध्ये प्रतिनिधीत्व देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या इतिहासातील हे सर्वात तरुण मंत्रिमंडळ असणार आहे. कारण मोदी सरकारच्या (Modi Government) मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे मंत्रिमंडळाची सरासरी तशी कमी असणार आहे. याशिवाय महिलांनाही मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले आहे.
महाराष्ट्रामधून खासदार नारायण राणे (Narayan Rane), हिना गावित (Hina Gavit), कपील पाटील (Kapil Patil), आणि भागवत कराड (Bhagwat Karad) यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 2019 मध्ये झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधीनंतर केंद्रीय मंत्रिमडळामध्ये कोणत्याही प्रकारचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी सरकारचा हा पहिलाच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार असून राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न यामधून केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. शिरोमणी अकाली दल, शिवसेना हे घटक पक्ष एनडीमधून बाहेर पडले आहेत. तर लोक जनता पक्षाचे नेते राम विलास पासवान यांचे निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त झाले आहे. त्याशिवाय अनेक मंत्र्यांच्या खात्यामध्येही फेरबदल करण्यात येणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.