DA hike dainik gomantak
देश

Hike in DA : केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट, डीएमध्ये ३ टक्के वाढ

केंद्र सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट; महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट जाहिर केली असून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर महागाई भत्ता ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जाहीर केलेली भाडेवाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल. तर महागाई भत्ता वाढल्याने केवळ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाच फायदा याचा होणार नाही तर केंद्र सरकारकडून पेन्शन मिळवणाऱ्या कुटुंबानाही याचा फायदा होईल. त्यांना ही दरवाढ डिअरनेस रिलीफ (DR) स्वरूपात मिळणार आहे. (Union Cabinet approves DA hike for central govt employees)

दरम्यान याबाबत आज जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत (DR) चा अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मान्यता दिली. तसेच महागाई भत्ता आणि महागाई रिलीफ या दोन्हींचा एकत्रित परिणाम वार्षिक रु. 9,544.50 कोटी असेल. याचा फायदा सुमारे 47.68 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना (pensioners) होणार आहे.

तर सातव्या वेतन आयोगाच्या (7th pay commission) शिफारशींनुसार, महागाई भत्ता आणि महागाई रिलीफ वर्षातून दोनदा वाढवली जाते. ही वाढ सहामाही आधारावर केली जाते. यावेळी 1 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत ही वाढ लागू होणार आहे. तर 1 जानेवारी 2022 पासून हा निर्णय लागू झाल्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे.

दरम्यान कोरोना साथीच्या (coronavirus pandemic) आजारामुळे सरकारने (government) 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत DA/DR मधील वाढ थांबवली होती. तथापि, सरकारने 1 जुलै 2021 पासून DA/DR मध्ये पुन्हा वाढ सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT