IRCTC, tourists can enjoy cruises to Goa, Lakshadweep, Kochi and Sri Lanka  Dainik Gomantak
देश

IRCTC द्वारे घेता येणार समुद्रपर्यटनाचा आनंद, ऑनलाईन होणार बुकिंग

IRCTCची क्रूझ कंपनी 6 सप्टेंबर 2021 पासून आपला पहिला प्रवास सुरू करणार आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून आता समुद्रपर्यटनासाठी तिकिट बुक करता येणार आहे. IRCTC ने यासाठी Cordelia Cruise Company सोबत करार केला आहे. क्रूझ (Cruise) कंपनी 6 सप्टेंबर 2021 पासून आपला पहिला प्रवास सुरू करणार आहे.

ऑनलाईन पोर्टलद्वारे बुकिंग

  • आयआरसीटीसीने ऑनलाईन पोर्टलवरून समुद्रपर्यटनचे बुकिंगही सुरू केले आहे. या अंतर्गत पर्यटक गोवा, लक्षद्वीप, कोची आणि श्रीलंका सारख्या ठिकाणी क्रूझ वरून पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील.

  • पहिल्या टप्प्यात क्रूझचा बेस मुंबई असेल. या पॅकेजमध्ये पर्यटकांना गोवा आणि दीव जाण्याची सोय करण्यात आली आहे.

  • त्यानंतर क्रूझच्या दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये कोची दीव जाण्याची सोय करण्यात येणार आहे. 3 आणि 4 दिवसांच्या या पॅकेजमध्ये, प्रवाशांना लक्षद्वीप, गोवा, मुंबई येथे जाण्याची सोय केली जाईल.

  • त्याचा तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच मे 2022 मध्ये क्रूझ चेन्नईला हलवली जाईल. तेथून या क्रूझचा प्रवास कोलंबो, गाले, जाफना आणि त्रिकोमालीसारख्या ठिकाणी होणार आहे.

तीन श्रेणींमध्ये असणार क्रूझ भाडे

  1. हे क्रूझ भाडे तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई ते गोवा दोन रात्रीच्या प्रवासासाठी 17,877 रुपये मोजावे लागतील.

  2. समुद्रमुखी रूमसाठी, मुंबई ते गोवा दौऱ्यासाठी 25,488 रुपये भाडे द्यावे लागेल. हा दौरा दोन रात्रीसाठी असणार आहे.

  3. समुद्रमुखी दृश्य असलेल्या बाल्कनी रूमसाठी, मुंबई ते गोवा दौऱ्यासाठी 31,506 रुपये द्यावे लागतील. हा दौरा दोन रात्रींसाठी असेल.

  4. या क्रूझवर पंचतारांकित हॉटेल्स सारख्या सुविधा असतील आणि प्रवाशांना स्विमिंग पूल, बार, ओपन थिएटर आणि जिमची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रवाशांसाठी असतील हे नियम

IRCTC ने क्रूझ प्रवासाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या अंतर्गत, क्रूझवर प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी कोरोना लस घेणे अनिवार्य असणार आहे. क्रूझवर प्रवासासाठी ही एक अत्यंत आवश्यक अट आहे. तसेच 72 तासांपूर्वीचा RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट देखील आवश्यक असेल. त्याचबरोबर क्रूझमधील सर्व क्रू मेंबर्सचे लसीकरणही केले जाईल. लोकांच्या सोयीसाठी वैद्यकीय पथक क्रूझवर तैनात केले जाणार आहे. तसेच प्रवाशांची आरोग्य तपासणीही केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Goa Tour Package: बजेटमध्ये गोवा टूर! आयआरसीटीसी घेऊन आलंय जबरदस्त पॅकेज; 3 रात्री 4 दिवसांच्या सैरसाठी लगेच बुकिंग करा

Montha Cyclone Latest Update: 'मोन्था' चक्रीवादळानं धारण केलं रौद्र रुप, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार, ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे; रेड अलर्ट जारी

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात जाताय? बसेल हजारोंचा दंड, गाडी चालवताना 'हे' नियम हवे तोंडपाठ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

SCROLL FOR NEXT