Goa Tour: IRCTCची खास ऑफर; फक्त 1000 रुपयांत करा गोवा सफर

Goa Tourism: भारतीय रेल्वेच्या PSU IRCTC ने ईशान्येकडील लोकांसाठी एक विशेष टूर पॅकेज लाँच केले आहे.
Goa Tour Package by IRCTC
Goa Tour Package by IRCTCDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (Indian Railway Catering and Tourism Corporation) गोव्यासाठी एक टूर पॅकेज (Goa Tourism) लाँच केले आहे. फक्त एक हजार रुपयांमध्ये पर्यटक गोव्याचा आनंद घेऊ शकणार आहे. आयआरसीटीसी प्रथमच ईशान्येकडील त्रिपुरापासून दौरा सुरू करणार आहे, म्हणजेच ईशान्येकडील लोक या पॅकेजचा चांगला लाभ घेवून पर्यटनांचा आनंद घेऊ शकतात. हा प्रवास आगरतळा येथून सुरू होणार आहे.

भारतीय रेल्वेच्या PSU IRCTC ने ईशान्येकडील लोकांसाठी एक विशेष टूर पॅकेज लाँच केले आहे. हा दौरा 11 रात्री 12 दिवसांसाठी अयोजीत करण्यात आला आहे. या पॅकेजच्या दोन श्रेणी असतील. पहिली स्लीपर आणि दुसरी एसी क्लास. स्लीपर वर्गाचे एकूण भाडे 11340 रुपये असेल. अशा प्रकारे, 12 दिवसांच्या दौऱ्यानुसार, सरासरी भाडे दररोज सुमारे एक हजार रुपये असेल. रेल्वे भाड्याव्यतिरिक्त, यात नाश्ता, रात्रीचे जेवण आणि स्थानिक वाहतूक, हॉटेल मध्ये राहणे इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे.

त्याचबरोबर एसी क्लासचे भाडे 18900 रुपये असणार आहे. यात नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, मुक्काम आणि स्थानिक वाहतूक, गाइड इत्यादींचा समावेश असणार आहे. म्हणजेच, स्लीपरचे भाडे प्रति दिन 1000 रुपये आणि एसीचे 1500 रुपये प्रतिदिन असणार आहे. यापैकी चार दिवस गोव्यात राहता येणार आहे. या दरम्यान, उत्तर आणि दक्षिण गोवा व्यतिरिक्त, ऐतिहासिक चर्च देखील बघता येणार आहे.

Goa Tour Package by IRCTC
कोरोनाचा धोका लक्षात घेता, रुग्णालयात लहान मुलांसाठी 'बाल चिकित्सा ICU’

IRCTC ने पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणाहून बोर्डिंगची व्यवस्था केली आहे. त्रिपुरामधील आगरतळा येथून ही ट्रेन प्रवास सुरू करणार आहे. पर्यटकांना येथून बोर्डिंग करू शकता येणार आहे, याशिवाय पर्यटक बदरपूर जं., गुवाहाटी, न्यू बोंगाईगाव, न्यू अलीपुरद्वार, न्यु कूच बिहार, न्यूज जलापाई गुडी, मालदा टाउन इत्यादी शहरांमधून बोर्डिंग करू शकतात.

पाच वर्षांखालील मुलांसाठी मोफत तिकीट

हा टूर पॅकेज त्या पर्यटकांसाठी फायदेशीर आहे ज्यांची मुले पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलासाठी कोणतेही भाडे असणार नाही. परंतु पाच वर्षांवरील मुलाला पूर्ण भाडे आकारले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com