जर कोणी IRCTC च्या नावाने फोन केला तर सावध रहा, अन्यथा बँक खाते रिकामे होईल

IRCTC ने आपल्या दुसऱ्या ट्विट मध्ये लिहिले आहे की, "असे लोक वेगवेगळ्या नंबर वरून कॉल करतात आणि काही लिंक ग्राहकांना पाठवतात. संपूर्ण परतावा प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित आहे.
जर कोणी IRCTC च्या नावाने फोन केला तर सावध रहा, अन्यथा बँक खाते रिकामे होईल
जर कोणी IRCTC च्या नावाने फोन केला तर सावध रहा, अन्यथा बँक खाते रिकामे होईल Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: जर तुम्हाला आयआरसीटीसी (IRCTC) परताव्यासाठी कोणत्याही नंबरवरून कॉल आला आणि त्यांना परतावा मिळवण्यासाठी (To get a refund) कोणताही फॉर्म भरण्यास सांगितले गेले तर सावधगिरी बाळगा. (Be careful if you are asked to fill out a form) कारण हा फसवणुकीचा एक प्रकार आहे. जर तुम्ही या कॉलवर दिलेल्या सूचनांनुसार कोणताही फॉर्म भरला तर तुमच्या बँक खात्यातूनही पैसे काढता येतील. IRCTC ने आपल्या ट्विटर हँडलद्वारे तक्रारीला उत्तर देताना ही माहिती दिली आहे.

जर कोणी IRCTC च्या नावाने फोन केला तर सावध रहा, अन्यथा बँक खाते रिकामे होईल
IRCTC Onam Special Train: बघता येणार केरळ गोवा, दिल्ली, स्टॅच्यू ऑफ युनिटी...

आयआरसीटीसीच्या ट्विटर हँडलवर एका वापरकर्त्याने तक्रार करताना असे लिहिले आहे की, "मला या क्रमांकावरून +918350050562 एक कॉल आला आहे, ज्यामध्ये कॉलर आयआरसीटीसीचा अधिकारी असल्याचे सांगितले आणि आपल्याला एक लिंक पाठविण्यात आली आहे असेही त्याने नमूद केले.

या लिंकच्या माध्यमातून आपण केलेल्या तक्रारीच्या संदर्भात आपले पैसे परत करता येतील असे सांगण्यात आले. मला यात काहीतरी चुकीचे दिसल्याने मी याबाबत IRCTC च्या ट्विटरवर टाकले आणि, या प्रकरणाची दखल घ्यावी असे सांगितले." असे तक्रारदाराने या ट्विटमध्ये म्हणले आहे.

जर कोणी IRCTC च्या नावाने फोन केला तर सावध रहा, अन्यथा बँक खाते रिकामे होईल
Goa Tourism: गोव्याला फेणी पर्यटनाचा पर्याय

वापरकर्त्याच्या या तक्रारीला प्रतिसाद म्हणून, IRCTC ने आपल्या ट्विटर हँडलद्वारे दोन ट्वीट केले आहेत. आयआरसीटीसीने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले, "वापरकर्त्यांना विनंती आहे की कोणत्याही लिंक किंवा संशयास्पद कॉलला प्रतिसाद देऊ नका कारण यामुळे युपीआय हँडल वापरणाऱ्यांसोबत आर्थिक फसवणूक होऊ शकते. ट्विटवरील फॉलोअर्सद्वारे आयआरसीटीसीच्या वापरकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. ज्यामध्ये बुकिंग आणि परताव्याबाबत प्रश्न विचारण्यात येत आहेत.

IRCTC ने आपल्या दुसऱ्या ट्विट मध्ये लिहिले आहे की, "असे लोक वेगवेगळ्या नंबर वरून कॉल करतात आणि काही लिंक ग्राहकांना पाठवतात. संपूर्ण परतावा प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित आहे. IRCTC च्या परताव्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही. त्यामुळे कृपया अशा दुव्यांना किंवा कॉलला प्रतिसाद देऊ नका." असे आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com