Rajnath Singh Dainik Gomantak
देश

Rajnath Singh: युक्रेनच्या डर्टी बॉम्बने वाढवले रशियाचे टेन्शन; भारताच्या संरक्षण मंत्र्यांशी केली चर्चा

डर्टी बॉम्बचे प्रत्युत्तर अण्वस्त्र हल्ल्याने देण्याचा रशियाचा युक्रेनला इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

Rajnath Singh: रशियाचे संरक्षण मंत्री सर्जेई शोईगु (Sergei Shoigu) यांनी बुधवराी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी उभय नेत्यांमध्ये युक्रेनच्या डर्टी बॉम्बबाबत चर्चा झाली. (Russia-Ukraine War)

शोईगु यांनी राजनाथ सिंग यांना युक्रेनमधील सद्यस्थितीतबाबत माहिती दिली. युक्रेन त्यांच्याकडील डर्टी बॉम्ब (Dirty Bomb) चा वापर करू शकतो, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. युक्रेनमधील परिस्थिती अधिक बिघडत चालली आहे. अशात युक्रेनकडून या बॉम्बचा वापर होऊ शकतो, असे शोईगु म्हणाले. दरम्यान, शोईगु यांनी याबाबत अमेरिका, इंग्लंड, तुर्की, या देशांनाही कल्पना दिली आहे.

दरम्यान, राजनाथ सिंग यांनी युक्रेन-रशिया युद्धाबाबत संवाद, कुटनीती हेच मार्ग योग्य ठरतील, असे म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्र वापराचा विचार होऊ नये, यावरही त्यांनी जोर दिला. अण्वस्त्र वापर किंवा किरणोत्सारी अस्त्रांचा वापर हा मानवतेच्या मुलभूत सिद्धांताविरोधात आहे, असे सिंग म्हणाले. दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय मुद्यांवरही चर्चा झाली. संरक्षण सहकार्यावर चर्चा झाली.

युक्रेनने रशियाचा दावा फेटाळला

रशियाचे संरक्षण मंत्री सर्जेई शोईगु यांनी रविवारी याच विषय़ावरून नाटो संघटनेतील देशांच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली होती. तथापि, युक्रेनने मात्र रशियाचा दावा फेटाळला आहे. युक्रेन डर्टी बॉम्बचा वापर करण्याची तयारी करत असल्याच्या रशियाच्या चिंतेत काही अर्थ नाही. रशियाला जाणीवपुर्वक असे आरोप करत आहे, असे युक्रेनने म्हटले आहे. युक्रेनच्या डर्टी बॉम्बला अण्वस्त्र हल्ला समजला जाईल, आणि त्याचे प्रत्युत्तर अण्वस्त्रांनीच दिले जाईल, असा इशारा रशियाने दिला आहे.

रशियाने दोन आठवड्यापुर्वी क्रिमियातील एका मोठ्या स्फोटाच्या प्रत्युत्तरात युक्रेनच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला होता. तेव्हापासून दोन्ही देशात प्रचंड तणाव आहे. या स्फोटासाठी रशियाने युक्रेनला जबाबदार धरले आहे. दरम्यान, युक्रेनमधील भारतीय दुतावासाने तेथील भारतीयांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT