Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

'धर्माच्या नावावर हत्या सहन करु शकत नाही...', उदयपूर घटनेवर राहुल गांधी म्हणाले

नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्या दुकानदाराच्या हत्येनंतर उदयपूरमध्ये तणावाचे वातावरण आहे.

दैनिक गोमन्तक

नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्या दुकानदाराच्या हत्येनंतर उदयपूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. हत्येतील आरोपीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. धर्माच्या नावाखाली अशी तोडफोड खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. (Udaipur Shopkeeper Murder Nupur Sharma Rahul Gandhi Said Should Be Strict Punishment)

दरम्यान, एका ट्विटमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, 'उदयपूरमधील जघन्य हत्येमुळे मला खूप मोठा धक्का बसला आहे. धर्माच्या नावावर होणारी क्रूरता खपवून घेतली जाणार नाही. या क्रूरतेमुळे दहशत पसरवणाऱ्यांना त्वरित शिक्षा झाली पाहिजे. आपण सर्वांनी मिळून द्वेषाचा पराभव केला पाहिजे. मी सर्वांना आवाहन करतो, कृपया शांतता राखा.'

असदुद्दीन ओवेसी यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही केली

असदुद्दीन ओवेसीही (Asaduddin Owaisi) ट्वीटमध्ये म्हणाले की, 'उदयपूरमधील निर्घृण हत्या निंदनीय आहे. अशा हत्येचा कोणीही बचाव करु शकत नाही. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. आम्ही नेहमीच हिंसेला विरोध केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. कायद्याचे राज्य राखले पाहिजे.'

दुसरीकडे, या घटनेनंतर उदयपूरमधील (Udaipur) बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. हिंदु संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली. उदयपूर जिल्ह्यात 24 तासासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा (Governor Kalraj Mishra) यांनीही या घटनेचा निषेध केला असून हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी जनतेला जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT