देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना केवळ आश्वासने दिली आहेत. यामूळे देशातील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. असे मत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. त्यांनी या आशयाचे ट्विट केले आहे. (Rahul Gandhi criticizes Prime Minister Narendra Modi over unemployment in the country )
गेले काही दिवस संपुर्ण देशभरात युवकांकडून सुरु असलेली निदर्शने आणि अग्निपथ योजनेबाबत असलेली नाराजी यांचा संदर्भ देत देशात तणावाचे वातावरण आहे. तसेच वाढत असलेली बेरोजगारी यावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या समस्येवरुन देशभरातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारने या योजनेवरुन पुन्हा एकदा विचार करणे आवश्यक असल्याचं म्हटले आहे. तसेच देशातील अनेक राजकिय पक्षांनी ही या योजनेला विरोध दर्शवला आहे. असे असताना भाजप नेते मात्र अग्निपथ योजना युवकांसाठी कशी हितकारक आहे. हे सांगताना दिसत आहेत.
याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, वारंवार नोकऱ्यांची खोटी आशा दाखवून पंतप्रधानांनी देशातील तरुणांना बेरोजगारीच्या ‘अग्निपाथ’वर चालण्यास भाग पाडले आहे. सद्या अग्निपथ योजनेवरुन तापलेले वातावरण आणि युवकांचा संताप या सर्व स्थितीला सरळ सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत. तसेच मोदी सरकारने देशातील युवकांना 8 वर्षात 16 कोटी नोकऱ्या देणे अपेक्षित असताना बेरोजगार तरुणांना फक्त पकोडे तळण्याचे ज्ञान मिळाले. असा टोला ही त्यांनी लगावला. राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर आपली तोफ डागणे सुरुच ठेवले आहे. त्यामूळे मोदी सरकार ही स्थिती कशी हाताळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोदी सरकारने योजना आणल्या आणि नागरिकांनी त्या नाकारल्या
केंद्र सरकारने घेतलेले अनेक निर्णय केंद्राला कसे मागे घ्यावे लागले. याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांना देशातील जनतेला काय हवे आहे. ते समजत नाही कारण त्यांना त्यांच्या 'मित्रांच्या' आवाजाशिवाय दुसरे काहीही ऐकू येत नाही. असा टोला ही गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला होता.
याबाबत राहुल गांधी म्हणाले की, अग्निपथ योजना देशातील तरुणांनी नाकारली, कृषी कायदा देशातील शेतकऱ्यांनी नाकारला, नोटाबंदीचा निर्णय अर्थतज्ज्ञांनी नाकारला आहे. तसेच जीएसटीने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांनी नाकारला आहे. या प्रत्येक मुद्यावरुन देशात मोठे वादंग उठले होते. अग्निपथ योजना केंद्राने जाहीर केली आणि देशातील अनेक राज्यात युवकांनी याला विरोध दर्शवण्यासाठी निर्दशने सुरु केली आहेत. या निदर्शनात अनेक ठिकाणी जमाव हिंसक झाल्याचं संपुर्ण देशाने पाहीले आहे. असा ही टोला राहूल गांधी यांनी लगावला होता. यावर केंद्र सरकार काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.