NIA  Dainik Gomantak
देश

Udaipur Killing Case: उदयपूर हत्याकांडातील 9 व्या आरोपीला NIA ने केली अटक

Udaipur: या प्रकरणातील ही नववी अटक असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Udaipur Killing Case: राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात टेलर कन्हैयालालच्या निर्घृण हत्येचा कट रचणाऱ्या मुस्लिम खानला राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. या प्रकरणातील ही नववी अटक असल्याचे त्यांनी सांगितले.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, '41 वर्षीय मुस्लिम खान उर्फ ​​मुस्लिम रझा हा राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने कन्हैयालालच्या हत्येच्या कटात "सक्रिय भूमिका" बजावली होती.' एनआयएने 29 जून रोजी तपास हाती घेतला आणि आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक केली. यापूर्वी, 21 जुलै रोजी एजन्सीने खेरवारा येथील सिंधी सरकारी हवेली येथील रहिवासी मोहम्मद जावेद (Mohammed Javed) याला अटक केली होती.

दुसरीकडे, व्यवसायाने टेलर असलेल्या कन्हैया लालची (Kanhaiya Lal) 28 जून रोजी उदयपूरमध्ये त्याच्या दुकानात हत्या करण्यात आली. हा हल्ला रियाझ अख्तारी नावाच्या व्यक्तीने केला होता. तर या संपूर्ण घटनेची नोंद त्याचा साथीदार गौस मोहम्मद याने केली होती. विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडिओ त्यांनी ऑनलाइन पोस्ट केला होता. नंतर दोन्ही आरोपींनी आणखी एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये त्यांनी इस्लामच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी ही हत्या केली असल्याचे म्हटले होते. मात्र, खुनाच्या काही तासांनंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

या निर्घृण हत्येद्वारे दोघांनाही संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण करायचे होते, असे एनआयएने म्हटले आहे. या दोघांनी हत्येची जबाबदारी स्वीकारणारा व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केला ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनाही धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजन्सी या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय संबंधांच्या पैलूची चौकशी करत आहे. ते पुढे म्हणाले की, प्राथमिक तपासातही कन्हैयालालच्या हत्येच्या कटात आणखी लोक सामील असण्याची शक्यता आहे.'

एनआयए अधिकार्‍यांनी पुढे असेही सांगितले की, 'हे दोघे आरोपी पाकिस्तानस्थित सुन्नी इस्लामिक संघटनेचे दावत-ए-इस्लामीचे सदस्य होते. त्यांच्यापैकी एक पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांच्या संपर्कात होता. तथापि, ते म्हणाले की, कोणताही निष्कर्ष काढणे खूप घाईचे होईल.

त्याच वेळी, कराचीमधून (Karachi) काम करणार्‍या दावत-ए-इस्लामीच्या वेबसाइटनुसार, "ही एक जागतिक गैर-राजकीय इस्लामिक संघटना आहे, जी कुराण आणि सुन्नतचा जगभरात प्रसार करण्याचे काम करते." या संघटनेची स्थापना 2011 मध्ये झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

महाराष्ट्र, कर्नाटकात दारु तस्करी रोखण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय, सीमेवर उभारणार तपासणी नाका Video

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

SCROLL FOR NEXT