Crime  Dainik Gomantak
देश

Delhi: दिल्लीतील मुंडका परिसरात दोन गटांत तुंबळ हाणामारी, 2 ठार; 7 जखमी

Delhi Crime: राजधानी दिल्लीतील मुंडका भागातील फ्रेंड्स एन्क्लेव्हजवळ दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात दोन जण ठार तर 7 जण जखमी झाले आहेत.

Manish Jadhav

Delhi Crime: राजधानी दिल्लीतील मुंडका भागातील फ्रेंड्स एन्क्लेव्हजवळ दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात दोन जण ठार तर 7 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मारामारी दुपारी 1:36, 1:42 आणि 1:47 वाजता झाली. चाकूने वार करुन मृत्यू झाल्याबाबत पीसीआर कॉल आला. या माहितीवरुन पोलीस मुंडका येथील फ्रेंड्स कॉलनी येथील डी-15 ए येथे पोहोचले.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पुढील गल्लीत राहणारा सोनू आणि अभिषेक यांच्यात येथे भांडण झाले. अभिषेक आणि त्याच्या मित्रांनी सोनूला मारहाण केली आणि मध्यस्थांनाही धक्काबुक्की केली.

यानंतर, सोनूच्या गटातील लोकांनी अभिषेकलाही मारहाण केली आणि त्यालाही धक्काबुक्की केली. या भांडणात सोनू आणि नवीन यांचा मृत्यू झाला तर अभिषेक आणि अन्य एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना सफदरजंग रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आले आहे. अन्य तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांवरही जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 10 July 2026: आज नशिबाची शंभर टक्के साथ! 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; ग्रहांची नक्षत्रांमधील स्थिती करणार श्रीमंत

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT