Delhi: 'दिल है की...', बायकोला घटस्फोट देऊन पठ्ठ्यानं ट्रान्सजेंडरशी बांधली लग्नगाठ!

'दिल है की मानता नहीं' हे गाणे तुम्ही ऐकलेच असेल. अनेकदा लोक मनाचे ऐकून चुका करतात आणि नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात.
Muslim Woman
Muslim Woman Dainik Gomantak
Published on
Updated on

Delhi News: 'दिल है की मानता नहीं' हे गाणे तुम्ही ऐकलेच असेल. अनेकदा लोक मनाचे ऐकून चुका करतात आणि नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. असाच एक प्रकार पूर्व दिल्लीतील भजनपुरा येथून समोर आला आहे. तिहेरी तलाकचे अनोखे प्रकरण इथे समोर आले आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे.

मात्र, त्याने कोणत्या कारणासाठी हा घटस्फोट दिला हे जाणून घेतल्यावर तुमचे मन हेलावून जाईल. खरे तर, 30-32 वर्षांनी आफताब नावाच्या व्यक्तीने 'तलाक-तलाक-तलाक' म्हणून स्वतःला पत्नीपासून वेगळे केले आहे.

पत्नीला सोडून ट्रान्सजेंडरशी लग्न केले

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मुस्लिम महिला संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून 2022 रोजी भजनपुरा पोलिस स्टेशनमध्ये घरगुती हिंसाचाराची तक्रार समोर आली होती. तक्रार करणारी महिला भजनपुरा येथील रहिवासी आहे.

Muslim Woman
Video: ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ घोषणा देणाऱ्यांना अमित शाहांनी सुनावलं, म्हणाले..

पीडित महिलेच्या (Woman) म्हणण्यानुसार, 30-32 वर्षांपूर्वी तिची आफताब नावाच्या व्यक्तीशी भेट झाली होती. या लग्नापासून आफताबला 6 मुले झाली. पण आता त्याने पीडितेला घटस्फोट देऊन एका ट्रान्सजेंडरशी लग्न केले आहे.

ओरडला - तलाक, तलाक, तलाक

मात्र, आता तिचा पती आफताब याने दुसरं लग्न करुन कर्दमपुरी येथे कुठेतरी राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आफताब आता पीडित महिलेवर घर सोडण्यासाठी दबाव आणत आहे. घर न सोडल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही देत ​​आहे.

Muslim Woman
अमित शहा म्हणाले, 'SIT समोर नरेंद्र मोदी नाटक करत गेले नव्हते...'

दुसरीकडे, महिलेचे म्हणणे आहे की, 7 जुलै 2022 रोजी आफताबने तिला घरातून बाहेर काढण्यापूर्वी तिच्याशी गैरवर्तन केले आणि 'तलाक-तलाक-तलाक' असे ओरडून स्वतःला वेगळे केले. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार क्राईम अगेन्स्ट वुमन सेलकडे पाठवली आहे. याप्रकरणी आता पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com