Karnataka Crime News Dainik Gomantak
देश

खाजगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यीनी अन् मित्राने संपवले जीवन

Karnataka Crime News: मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने आधी आपला जीव घेतला. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून अस्वस्थ झालेल्या मुलानेही मग आपले जीवन संपवले.

Ashutosh Masgaunde

Two College Students from Karnataka Ended lives after Private Video Went Viral on Social Media:

दावणगेरे येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनी आणि तिच्या मित्राने त्यांचा खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने आधी आपला जीव घेतला. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून अस्वस्थ झालेल्या मुलानेही मग आपले जीवन संपवले.

सूत्रांनी सांगितले की सुमारे दोन महिन्यांपूर्वी, हे दोन विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयाच्या टेरेसवर एकत्र असताना, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या नकळत त्यांचा व्हिडिओ शूट केला होता. 3.21 मिनिटांचा हा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

दावणगेरेचे पोलिस अधीक्षक के अरुण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कुटुंबांनी स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. आणि आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करणाऱ्या आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

पोलीस अधिकाऱ्याने तपास आणि विद्यार्थ्यांची ओळख याबद्दल अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.

दरम्यान, काही पालकांनी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली असून, या प्रकरामुळे त्यांना त्यांच्या मुलांचीही चिंता वाटू लागली असल्याचे काही पालकांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी उडुपी येथील महाविद्यालयातील विद्यार्थीनींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर कर्नाटकात मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

ही घटना ताजी असतानाच आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच प्रकरण समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: डोंगर कापणी वादाचा बळी, जबर मारहाणीत ज्येष्ठाचा मृत्यू; मोरजीसह राज्यात खळबळ

Horoscope: आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; वाचा तुमच्या राशीचे भविष्य!

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

Goa Crime: 63 वर्षीय भाडेकरुची निर्घृण हत्या, डोंगर कापणीच्या तक्रारीतून अज्ञातांकडून मारहाण; मोरजीतील धक्कादायक घटना

IND vs SA: दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतची धमाकेदार एंट्री; सोपवली उपकर्णधारपदाची जबाबदारी!

SCROLL FOR NEXT