Yogi Adityanath  Dainik Gomantak
देश

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे Twitter Account हॅक

रात्री उशिरा सीएमओ यूपीचे अकाउंट हॅक झाल्यानंतर सर्वप्रथम प्रोफाइलमधील चित्र बदलण्यात आले.

दैनिक गोमन्तक

शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले. सीएमओच्या (CMO) अकाउंटचा फोटो आणि बॅकग्राउंड चित्र बदलण्यासोबतच हॅकरने शेकडो लोकांना टॅग केले आणि अनेक ट्विटही केले. मिळालेल्या माहितीनुसार, सीएमओचे हे अकाउंट सकाळी 12.30 च्या सुमारास हॅक झाले. ही त्रुटी सुमारे 40 मिनिटे अशीच राहिली आणि 1.10 मिनिटांनी अकाउंट पुन्हा सुरू झाले. (Twitter account of Uttar Pradesh CMO hacked at midnight)

रात्री उशिरा सीएमओ यूपीचे (UP) अकाउंट हॅक झाल्यानंतर सर्वप्रथम प्रोफाइलमधील चित्र बदलण्यात आले. यानंतर ब्लूबॅजर नावाच्या ट्विटर हँडलचा स्क्रीनशॉट gif फॉरमॅटमध्ये शेअर करण्यात आला.

अकाऊंट हॅक करणाऱ्या हॅकरने पिन केलेल्या ट्विटमध्ये अ‍ॅनिमेटेड पिक्चर तयार करण्यासाची माहिती दिली होती. यासोबत तीन टप्प्यांची प्रक्रियाही सांगण्यात आली. याची लिंकही दिली होती. याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयाच्या वेबसाइटऐवजी bayc-animator.com असे लिहिलेले दिसले. मात्र ही लिंक काम करत नव्हती. ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला मिळताच ते पूर्ववत करण्याची कसरत सुरू झाली.

वापरकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली
UP CMO चे अकाउंट हॅक झाल्याची माहिती ट्विटर यूजर्सना मिळताच, लोकांनी स्क्रीनशॉट काढायला सुरुवात केली. यासोबतच यूपी पोलिस (Police), एनआयए, सायबर दोस्त, यूपी सरकार, केंद्र सरकार, ट्विटर इंडिया यासारख्या संस्थांना टॅग करत हे स्क्रीनशॉट शेअर करण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT