Akhilesh Yadav News Updates Dainik Gomantak
देश

नुपूर शर्माविरोधात ट्विट करणे पडले महागात; अखिलेश यादव यांच्यावर कारवाईची मागणी

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपच्या निलंबित सदस्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात केलेले ट्विट चिथावणीखोर असल्याचे सांगत राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) सोमवारी उत्तर प्रदेश पोलिसांकडे यादव यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

दैनिक गोमन्तक

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपच्या निलंबित सदस्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात केलेले ट्विट चिथावणीखोर असल्याचे सांगत राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) सोमवारी उत्तर प्रदेश पोलिसांकडे यादव यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.(Akhilesh Yadav News Updates)

नुपूर शर्माने मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात म्हटले होते की, 'नुपूर शर्मा यांच्या बेताल भाषेमुळे संपूर्ण देश पेटला आहे" आणि त्यांनी माफी मागावी.

कोर्टाच्या निर्णयाची बातमी शेअर करत अखिलेश यादव यांनी ट्विट केले होते की, 'फक्त चेहराच नाही तर शरीरानेही माफी मागितली पाहिजे आणि देशातील अशांतता आणि सलोखा बिघडवल्याबद्दल शिक्षाही झाली पाहिजे.'

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक डी.एस. चौहान यांना लिहिलेल्या पत्रात एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे की, हे ट्विट पूर्णपणे प्रक्षोभक आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि दोन धार्मिक गटांमधील सांप्रदायिक असंतोष भडकावणारे आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखिलेश यादव यांच्यावर तातडीने कारवाई करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT