Troops of the Indian Army's Trishakti Corps rescued 500 tourists stranded in Gangtok in East Sikkim due to snowfall and inclement weather. X, @trishakticorps
देश

Viral Video: सलाम! भारतीय लष्कराचे कौतुकास्पद काम, 500 पर्यटकांची केली मृत्यूच्या दारातून सुटका

Trishakti Corps: बांगलादेश युद्धादरम्यान पाकिस्तानी लष्कराला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्यात या कॉर्प्सने महत्त्वपूर्ण यश मिळवले होते.

Ashutosh Masgaunde

Troops of the Indian Army's Trishakti Corps rescued 500 tourists stranded in Gangtok in East Sikkim due to snowfall and inclement weather:

पूर्व सिक्कीममधील गंगटोक येथे बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे अडकलेल्या 500 पर्यटकांची भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांनी सुटका केली, अशी माहिती लष्कराने बुधवारी दिली.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारी रोजी अचानक झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे 500 हून अधिक पर्यटकांसह सुमारे 175 वाहने पूर्व सिक्कीमच्या नातू ला येथे अडकून पडली होती.

"त्रिशक्ती कॉर्प्सच्या तुकड्यांनी शून्याखालील तापमान पर्यटकांनना धीर देत त्यांच्या बचावासाठी धाव घेतली आणि अडकलेल्या पर्यटकांना मदत केली.

पर्यटकांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेवर मेडिकेअर, गरम नाश्ता, जेवण आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था करण्यात आली," असे लष्कराने सांगितले.

भारतीय सैन्याचे त्रिशक्ती कॉर्प्स सिक्कीममधील सीमांचे रक्षण करताना नागरी प्रशासन आणि लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असते, असे लष्कराने पुढे म्हटले आहे.

यापूर्वी 20 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये सीआरपीएफ जवानांनी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या वाहनांना मदतीचा हात दिला होता.

या प्रदेशाला सरी आणि बर्फवृष्टीचा फटका बसला आहे, परिणामी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते पर्जन्यवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनामुळे बंद झाले.

त्रिशक्ती कॉर्प्सचे कर्तुत्त्व

बांगलादेश युद्धादरम्यान पाकिस्तानी लष्कराला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्यात या कॉर्प्सने महत्त्वपूर्ण यश मिळवले होते.

1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यादरम्यान आणि 2017 मध्ये डोकलाममध्ये चीनशी भारताची अडचण, लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने ऑपरेशन ज्युनिपर राबवून आपली ताकद दाखवली होती.

1971 मध्ये पाकिस्तानच्या 16 इन्फंट्री डिव्हिजनच्या शरणागतीला कारणीभूत ठरलेल्या बोगरा आणि हिलीच्या ऐतिहासिक लढाया त्याच्या यशाचा दाखला आहेत. सध्या त्रिशक्ती कॉर्प्स सीमावर्ती भागातील संपूर्ण सुरक्षेवर सतत नजर ठेवण्याचे काम करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anjuna Gramsabha: हणजूण मारहाण प्रकरण चिघळले; दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल!

Pilgao Farmers Protest: पिळगावमधील महिला उतरल्या रस्त्यावर! सरकारसह लोकप्रतिनिधी लक्ष्य; खनिज वाहतूक बंदच

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

Sattari: सत्तरी तालुका लवकरच टँकरमुक्त! आमदार राणे यांचा निर्धार; वेळुस येथे 1.5 कोटींच्या कामाची पायाभरणी

Goa Live News: बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT