Goa CM Kerala Visit: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 'इलेक्शन मोड'मध्ये; केरळमध्ये घेतला 'लोकसभा' तयारीचा आढावा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे भाजपने दक्षिण भारतातील लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे.
Goa CM Kerala Visit
Goa CM Kerala VisitCM Twitter

Pramod Sawant Kerala Visit

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर दक्षिण भारताचा राजकीय दौरा सुरु केला आहे. दिल्ली दौऱ्यावरून परतलेले मुख्यमंत्री दीड दिवसच गोव्यात होते, ते आता तेलंगणमार्गे केरळमध्ये पोचले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे भाजपने दक्षिण भारतातील लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ते काल सोमवारी तेलंगणमधील भाजपच्या दोन विजय संकल्प यात्रेत सहभागी झाले. त्यानंतर ते आज केरळमध्ये पोचले आहेत.

Goa CM Kerala Visit
Goa Accident: गोव्यात अपघातसत्र सुरुच; बार्शेत महिलेचा मृत्यू, उसगावात एक गंभीर

सावंत यांनी इडुकी मतदारसंघातील भाजपच्या गाभा समितीची बैठक घेत लोकसभा तयारीचा आढावा घेतला. तेथे कोणते मुद्दे प्रचारात असतील हेही त्यांनी जाणून घेतले.

प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या तयारीचा अंदाजही त्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री कोट्टायम येथेही जाणार असून तेथे ते प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

Goa CM Kerala Visit
Goa News: म्हादई नदीत जम्मू काश्मीरचा कामगार बुडाला तर कोलवा येथे तीन वर्षीय मुलाला जीवदान

केरळमधील लोकसभा मतदारसंघात भाजपला विजर्या करण्यासाठी कोणते मुद्दे प्रभावी ठरू शकतील याचा अंदाज घेणे आणि संघटनात्मक पातळीवर तयारीचा आढावा घेणे, असा या बैठकीचा उद्देश असेल.

भाजपचा मी एक कार्यकर्ता आहे. त्या नात्याने पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणे माझे कर्तव्य: आहे. राज्याबाहेरही मी पक्ष संघटनेचे काम करू शकतो, हा विश्वास पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटल्याने मला ही जबाबदारी दिली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com