Assembly Elections Result 2023 Dainik Gomantak
देश

Assembly Elections Result 2023: नागालँड, त्रिपुरात पुन्हा भाजप; मेघालयात 'एनपीपी''ची आघाडी

त्रिपुरातून काँग्रेसचा सुपडासाफ

Akshay Nirmale

Assembly Elections Result 2023: ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. त्रिपुरामध्ये भाजप बहुमतासह पुन्हा सत्तेत येईल.

तर नागालँडमध्ये भाजप आणि भाजपचा सहयोगी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष एकत्रित सरकार स्थापन करतील, असे दिसते. मेघालयमध्ये त्रिशंकू परिस्थितीची चिन्हे दिसत आहेत.

नागालँड

नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपी युती प्रचंड बहुमताने विजय होताना दिसत आहे. भाजप युतीने 60 पैकी 36 जागांवर आघाडी मिळवली आहे. राज्यात भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत.

भाजपचे कामेझो किनिमी बिनविरोध विजयी झाले आहेत, तर तुएनसांग सदर-1 येथूनही भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेला नागा पीपल्स फ्रंट (NPF) केवळ दोन जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचा येथे सुपडा साफ होताना दिसत आहे.

मेघालय

येथे 60 जागा असून उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवर निवडणूक झाली नाही. 59 जागांसाठी मतदान झाले. सध्या एनपीपी 25 जागांवर आघाडीवर आहे. हाच सर्वात मोठा पक्ष ठरेल असे दिसते. भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली होती.

भाजप सध्या 3 जागांवर आघाडीवर आहे. ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष 5 जागांवर आघाडीवर आहे.

त्रिपुरा

या राज्यात सत्ताधारी भाजप + आयपीएफटी आघाडीला बहुमत मिळत असल्याचे दिसत हे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार ही आघाडी 34 जागांवर पुढे आहे. डावे आणि काँग्रेस आघाडी 14 जागांवर पुढे आहे.

दुसरीकडे टीएमपीने (TMP) सर्वांनाच धक्का देत 12 जागांवर आघाडी मिळवली आहे. त्रिपुरामध्ये भाजपच्या मोठ्या विजयाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT