Trinamool Congress MP Derek O'Brien

 

Dainik Gomantak 

देश

तृणमूल काँग्रेस खासदार डेरेक ओब्रायन संसदेच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन (Derek O'Brien) यांनी संसदेच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांना संसदेच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसचे (trinamool congress) नेते डेरेक ओब्रायन यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज राज्यमंत्र्यांनी मांडला होता. डेरेक ओब्रायन यांना हिवाळ्याच्या उर्वरित हंगामासाठी निलंबित करण्यात आले आहे. डेरेक ओब्रायन (Derek O'Brien) यांच्यावर मतदार यादी विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी सभात्याग करताना नियम पुस्तिका रिपोर्टर्सच्या टेबलाकडे फेकल्याचा आरोप आहे. येत्या चार दिवसांत संसदेचे अधिवेशन संपणार आहे. यापूर्वी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session Parliament) पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात गैरवर्तन आणि गोंधळ घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरु आहे. निलंबित खासदार आपल्या वर्तणुकीबद्दल माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाणार नाही, असे सरकारने तेथे स्पष्ट केले होते.

विशेष म्हणजे मतदार यादीला आधारशी जोडण्याचे विधेयक सरकारने लोकसभेत मंजूर केले आहे. या विधेयकास आज राज्यसभेत मंजूर करायचे आहे. त्यानंतर संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचा धोका असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र, सरकारने यास नासंपती दर्शवली आहे. मतदार यादीतील नक्कल रोखण्यासाठी आणि बनावट मतदारांना हटवण्यासाठी हे विधेयक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. आधारशी मतदार ओळखपत्र लिंक करण्याचे पूर्णपणे मतदाराच्या इच्छेवर अवलंबून असणार आहे. जर कोणी यासाठी आधार क्रमांक देत नसेल तर त्याचे नाव जोडणे नाकारता येणार नाही. तसेच या आधारे कोणाचेही नाव काढता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

धारगळच्या कमांड एरियातील जमीन केवळ कॅसिनोसाठी डेल्टा कंपनीला दिली; आलेमाव यांचा आरोप

SCROLL FOR NEXT