Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: विश्वास बसणार नाही! ट्रेनचं टॉयलेट झालं आलिशान 'प्रायव्हेट रूम'; पठ्ठ्याचा 'हा' व्हायरल व्हिडीओ पाहाच

Viral News: सोशल मीडियावर सध्या एक आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. कारण हा व्हिडिओ थेट भारतीय रेल्वेच्या शौचालयातून आलेला आहे.

Sameer Amunekar

सोशल मीडियावर सध्या एक आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. कारण हा व्हिडिओ थेट भारतीय रेल्वेच्या शौचालयातून आलेला आहे. कल्पना करा, ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही शौचालयात प्रवेश करता आणि आत तुम्हाला एखादा व्यक्ती आरामात झोपलेला, आपले छोटेसे "घर" बनवून बसलेला दिसतो.

इंस्टाग्रामवर सध्या ७.८ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेल्या या व्हिडिओने सर्वांनाच धक्का दिला आहे. कंटेंट क्रिएटर विशालने तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये एक प्रवासी, ट्रेनच्या एका लहानशा शौचालयाचे स्वतःच्या बेडरूममध्ये रूपांतर करताना दिसतो. या व्हिडिओमध्ये त्या प्रवाशाने शौचालयात सामान पसरवलेले आहे, खिडकीतून एक दुमडता येणारा बांबूचा पलंग लटकलेला आहे आणि तो माणूस शांतपणे झाेपला आहे.

विशाल या दृश्यावर हसतो आणि म्हणतो, “भाऊ, तू तर शौचालयालाच बेडरूम बनवून टाकलंस!” त्यावर तो माणूसही हसत उत्तर देतो, “हो भाऊ!” व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे “ट्रेनचे शौचालय बेडरूममध्ये बदलले.”

हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींना हा प्रसंग हास्यास्पद वाटला, तर काहींनी त्या प्रवाशाच्या "जुगाडू" वृत्तीचे कौतुक केले. एका वापरकर्त्याने लिहिले, “हा माणूस खरोखरच ट्रेनचा प्रवास एन्जॉय करत आहे!”

पण बहुतेक लोक मात्र संतापलेले दिसले. अनेकांनी कमेंट केली की, “शौचालय हे सर्व प्रवाशांसाठी आहे. असे त्याचे बेडरूम बनवणे चुकीचे आणि अस्वच्छतेचे आहे.” आणखी एका वापरकर्त्याने लिहिले, “रेल्वेने याला पुढच्या स्टेशनवरच उतरवले पाहिजे!”

या घटनेने भारतीय रेल्वेच्या गर्दीच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. विशेषतः सामान्य आणि अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांना उभे राहायलाही जागा नसते. सणासुदीच्या काळात ही परिस्थिती आणखीनच बिकट होते, ज्यामुळे अनेक प्रवासी शौचालयात बसतात, झोपतात किंवा प्रवास करतात.

रेल्वे प्रशासनाकडून या व्हिडिओवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या घटनेने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.आपल्या रेल्वे व्यवस्थेत सुधारणा कधी होणार आणि प्रवाशांना कधी आरामदायी प्रवास मिळणार?

हास्य आणि आश्चर्याच्या मिश्रणातून व्हायरल झालेल्या या व्हिडिओने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, भारतीय प्रवाशांचा “जुगाड” जगात कुठेही सापडणार नाही. पण त्याचवेळी या “जुगाड” मागे दडलेली प्रणालीतील कमतरताही नजरेआड करता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: 'अलविदा...' रोहित शर्माची पोस्ट व्हायरल! 'मुंबईचा राजा' घेणार निवृत्ती? चाहते चिंतेत

Goa Agriculture Damage: मोरजीत परतीच्या पावसाचा हाहाकार, भात शेती पाण्याखाली

Government Jobs: गोवा सरकारची मेगा भरती! आरोग्य खात्यात 59, तर समग्र शिक्षा अभियानात 66 कंत्राटी पदांसाठी 'सुर्वणसंधी'

7 मिनिटांत 850 कोटींचा दरोडा, नेपोलियन बोनापार्टच्या बायकोचे दागिने केले लंपास; जगप्रसिद्ध लूव्र म्युझियम चोरीप्रकरणी दोघे अटकेत!

Salman Khan Terrorist: बॉलिवूडचा 'टायगर' पाकिस्तानसाठी 'दहशतवादी', भाईजानच्या बलुचिस्तान विधानावरून पाकड्यांना झोंबली मिर्ची

SCROLL FOR NEXT