Spam Call New Rules Dainik Gomantak
देश

Spam Call New Rules: फेक आणि स्पॅम कॉल्सला बसणार चाप! ट्रायचा मोठा निर्णय; 'AI'च्या मदतीने स्पॅमर्सवर होणार कडक कारवाई

TRAI Spam Call New Rules: दिवस-रात्र येणाऱ्या नकोशा स्पॅम आणि फसव्या कॉल्समुळे त्रासलेल्या कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला.

Manish Jadhav

TRAI Spam Call New Rules: दिवस-रात्र येणाऱ्या नकोशा स्पॅम आणि फसव्या कॉल्समुळे त्रासलेल्या कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला. स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसच्या वाढत्या उपद्रवाला कायमचा आळा घालण्यासाठी ट्रायने नियमावली अधिक कडक केली. आता संशयास्पद नंबर आणि रोबोकॉल्सवर थेट नजर ठेवण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.

ट्रायच्या सुधारित नियमांनुसार, सॉफ्टवेअर किंवा ऑटो-डायलिंगद्वारे येणाऱ्या ॲप्लिकेशन-टू-पर्सन आणि रोबोकॉल्सवर टेलिकॉम कंपन्यांची कडक नजर असणार आहे. अशा प्रकारच्या कॉल्ससाठी कंपन्यांना पूर्वसूचना देणे अनिवार्य करण्यात आले असून, तसे न केल्यास त्या कॉल्सना स्पॅम मानून 5 पैसे प्रति मिनिट अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

एआय सिस्टीमच्या माध्यमातून संशयित स्पॅमर्सची ओळख पटवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. नव्या नियमांनुसार, जर एखाद्या नंबरविरोधात 10 दिवसांच्या आत 3 किंवा त्याहून अधिक तक्रारी आल्या आणि एआय सिस्टीमनेही तो नंबर संशयास्पद मानला, तर त्यावर लगेचच निर्बंध लादले जातील. 10 दिवसांत 5 पेक्षा जास्त संशयास्पद नंबर आढळल्यास संबंधितांची पुन्हा री-केवायसी आणि भौतिक पडताळणी केली जाईल. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या टेलिमार्केटर्सना 1 वर्षासाठी ब्लॅकलिस्ट केले जाईल आणि त्यांचे कनेक्शन खंडित केले जाईल.

ग्राहकांना (Customers) अनावश्यक मानसिक त्रासापासून वाचवणे आणि दूरसंचार व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणे हा या कडक नियमांचा मुख्य उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे, सेवा आणि बँकिंग व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या 1600, 1601 आणि 140 सीरिजच्या अधिकृत नंबरना कॉल मॅनेजमेंट ॲप्स थेट ब्लॉक करु शकणार नाहीत. जर एखाद्या ग्राहकाने प्रोडक्टची चौकशी केली असेल, तर कंपन्या त्याला जास्तीत जास्त 7 दिवसांपर्यंतच संपर्क साधू शकतील आणि त्याचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक असेल. स्पॅम तक्रारीच्या निवारणावर समाधानी नसल्यास ग्राहकांना 15 दिवसांच्या आत अपील करण्याची सोयही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 Saptember 2026: शनिवारचा महा-संयोग! बुधादित्य आणि भद्र राजयोगाने चमकणार 'या' राशींचे नशीब; बँक बॅलन्स अचानक वाढणार

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

SCROLL FOR NEXT