Allu Arjun Arrest Dainik Gomantak
देश

Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला अटक; चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई!

Sandhya Theater Pushpa 2 Screening Case: एकीकडे 'पुष्पा 2' ने चित्रपटगृहात गदर माजवला असताना दुसरीकडे सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

Manish Jadhav

Allu Arjun Arrested: एकीकडे 'पुष्पा 2' ने चित्रपटगृहात गदर माजवला असताना दुसरीकडे सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. त्याचं झालं असं की, अल्लू अर्जुनला हैदराबादच्या संध्या थिएटरप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

4 डिसेंबर रोजी, चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंग दरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले होते. या घटनेबाबत पोलिसांनी (Police) अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर आता थिएटर मालकासह तिघांना अटक करण्यात आली.

संध्या थिएटर प्रकरणी अटक

दरम्यान, ही घटना तेव्हा घडली जेव्हा 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला संध्या थिएटरमध्ये विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. लोक अॅडव्हान्स तिकीट काढून चित्रपट बघायला आले होते आणि अल्लू अर्जुनही तिथे येणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण अल्लू अर्जुनच्या टीमने अचानक त्याचा दौरा ठरवला आणि तो थिएटरमध्ये पोहोचताच त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे अल्लू अर्जुन आणि इतरांवर निष्काळजीपणाचे आरोप झाले.

उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले

अल्लू अर्जुनने या घटनेबाबत तेलंगणा उच्च न्यायालयात (High Court) अपील दाखल केले होते, ज्यामध्ये त्याने या घटनेत आपली कोणतीही चूक नसल्याचे म्हटले होते. त्यावेळी तो तिथे दुर्भाग्यवश उपस्थित होता. याआधीही एका प्रकरणात शिल्पा रवी रेड्डी यांच्या घरी घडलेल्या एका घटनेत तो हजर होता, मात्र त्या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला होता. आता या नव्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.

पुष्पा 2चा जलवा

या घटनेनंतरही 'पुष्पा 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात अनेक विक्रम मोडले असून आतापर्यंत जगभरात 1,000 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT