SSC Scam| manik bhattacharya  Dainik Gomantak
देश

SSC Scam: टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य यांना शिक्षक भरती घोटाळ्यात अटक

Recruitment scam: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य यांना ईडीने अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य (Manik Bhattacharya) यांना आज अटक केली आहे. भट्टाचार्य सोमवारी कोलकाता येथील सीजीओ कॅम्पस येथील ईडी कार्यालयासमोर हजर झाले होते. जेथे शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचवेळी, शिक्षक भरती घोटाळ्यातील कथित सहभागाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ईडीने त्याला अटक केली आहे. 

तपासात सहकार्य न केल्याने अटक
ईडीच्या पथकाने सोमवारी दुपारी माणिक भट्टाचार्य यांची चौकशी सुरू केली. प्रदीर्घ चौकशीदरम्यान तपासात सहकार्य न केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयने 27 सप्टेंबर रोजी टीएमसी आमदाराला चौकशीसाठी बोलावले होते, परंतु ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. 

सर्वोच्च न्यायालयाने अटकेला अंतरिम स्थगिती दिली होती
सीबीआयने (CbI) समन्स बजावल्यानंतर आमदाराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुढील आदेशापर्यंत सीबीआयच्या अटकेतून सूट दिली होती. मात्र, ताजी अटक ईडीने केली आहे. यापूर्वी, ईडीने या प्रकरणात पश्चिम बंगालचे (West Bengal) तत्कालीन उद्योगमंत्री आणि माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांनाही अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking News: रागाचा झटका बेतला जिवावर! स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून देवाला केला अर्पण; बायकोसोबतच्या वादातून 25 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Goa Human Trafficking: हरमल वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन संशयितांना जामीन, ठोस पुराव्यांचा अभाव; पीडित महिलांनी साक्ष देण्यास दिला नकार

Pisurle Mineral Block: पिसुर्ले खाण लिलाव प्रक्रियेत 'जेबीआर स्टोन'ची एन्ट्री; हायकोर्टाचा मोठा निकाल; तांत्रिक बिघाडामुळे रखडलेली निविदा स्वीकारण्याचे खाण संचालकांना आदेश

Horoscope May 2026: व्यापार-करिअरमध्ये मिथुन राशीची चांदीच चांदी! मे महिन्याची सुरुवात सुवर्णकाळ; सूर्याच्या कृपेने होणार भाग्योदय

पावसाळा तोंडावर पण पणजीत जीर्ण इमारतींचा प्रश्न 'जैसे थे'! अहवालाअभावी कारवाई रखडली; महापौरांचे आयुक्तांना तातडीने पाठपुराव्याचे आदेश

SCROLL FOR NEXT