Abhishek Banerjee Dainik Gomantak
देश

TMC General Secretary Abhishek Banerjee: ''आमची लढाई फक्त भाजपशी नाही तर...'' अभिषेक बॅनर्जी यांचा ब्रिगेड मैदानावरुन हल्लाबोल

TMC General Secretary Abhishek Banerjee: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे.

Manish Jadhav

TMC General Secretary Abhishek Banerjee: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. भाजप आणि कॉंग्रेसने पहिल्या टप्प्यातील आपल्या उमेदारांची यादी जाहीर केली आहे. यादरम्यान, सत्ताधारी भाजपसह विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच आज तृणमुल कॉंग्रेस पक्षाने (TMC) पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील ब्रिगेड मैदानावर मोठी रॅली काढली.

यादरम्यान तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, 'आम्ही हा कार्यक्रम 25 फेब्रुवारीला जाहीर केला होता. दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.' ते पुढे म्हणाले की, ''भाजपकडे ईडी, सीबीआय, न्यायव्यवस्था आहे. पण आमच्याकडे लोक आहेत. आमची लढाई केवळ भाजपशी नाही तर अधीर चौधरी यांच्या नेतृत्वाखालील डावे आणि बंगाल काँग्रेसशीही आहे.''

पवन सिंहबाबत अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, ''एका अभिनेत्याने बंगाली महिलांवर अनेक अपमानास्पद गाणी गायली, त्याला भाजपने आसनसोलमधून उमेदवारी दिली? मात्र, नंतर त्याने माघार घेतली. ते पुढे म्हणाले की, ''दिल्लीतून बाहेरचे लोक इथे येतात आणि मोदींच्या गॅरंटीबाबत सांगतात. मोदींची गॅरंटी काय आहे? मोदींची 0 वॉरंटी आहे. पूर्वी चोर तुरुंगात जायचे, पण आज ते भाजपमध्ये जात आहेत.''

TMC खासदार अभिषेक बॅनर्जी पुढे म्हणाले की, 'लोक अनेक गोष्टी सांगत होते, जसे नेत्यांच्या सोडचिठ्ठीनंतर तृणमूल नष्ट होईल. आज हा तृणमूल ब्रिगेडचा कार्यक्रम नसून गरिबांचा कार्यक्रम आहे.' केंद्रावर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, ''100 दिवसांच्या योजनेत काम करुनही बंगालमधील 59 लाख लोकांचा निधी थांबवला. ममता बॅनर्जी सरकारने त्यांची थकबाकी भरली. ही ब्रिगेड त्या 11.36 लाख कुटुंबांसाठी आहे, ज्यांना भाजपच्या निधी रोखण्याच्या निर्णयामुळे घरे मिळालेली नाहीत, भाजपला त्याची जागा दाखवण्यासाठी ही ब्रिगेड आहे.''

अभिषेक बॅनर्जी पुढे म्हणाले की, ''आम्ही आमचे विचार मांडले आहेत. आम्ही लोकांना त्यांच्या हक्काच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन करतो. आम्ही वचन दिले होते की, जर लोकांनी त्यांच्या हक्काच्या आधारे मतदान केले तर त्यांना मनरेगाचे प्रलंबित वेतन मिळेल. याची आम्ही खात्री केली.'' ते पुढे म्हणाले की, 'आज आम्ही जोनोगोनार गोर्जॉन, बांग्ला बिरोधिडर बिसोर्जॉन या कार्यक्रमाची घोषणा करतो.'

टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी शेवटी म्हणाले की, ''इथे प्रत्येकाने जॉय बांगला म्हणावे, जेणेकरुन दिल्लीतील सत्ताधीशांना काटांळी बसेल. जे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडतात, ते बंगाली विरोधी नाहीत का? रवींद्रनाथ टागोर आणि स्वामी विवेकानंद यांचा अपमान करणारे ते बंगाली विरोधी नाहीत का? बंगालचा निधी रोखून बंगालची बदनामी करणारे ते बंगाली विरोधी नाहीत का?''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

SCROLL FOR NEXT