Burning Train : मध्य प्रदेशातील (Burning Train) ग्वाल्हेर येथील हेतमपूरजवळ चालत्या ट्रेनला आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. उधमपूरहून दुर्गकडे जाणाऱ्या दुर्ग सुपरफास्ट एक्स्प्रेसला शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला असून, चार एसी डब्यांना आग लागली. आग लागल्यानंतर हेतमपूर स्थानकाजवळ ट्रेन थांबवण्यात आली. तसेच, लवकरच हे डबे इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी मुरैना आणि ढोलपूर येथून अग्निशमन दलालाही (Fire Brigade) बोलावण्यात आले होते. मात्र आग कशामुळे लागली यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पायलटने हेतमपूर स्टेशनवर ट्रेन थांबवली
उधमपूर दुर्ग 20848 ही गाडी शुक्रवारी धौलपूर स्टेशन पार करून चंबळ ओलांडून मोरेनाच्या दिशेने जात होती. त्यानंतर ट्रेनच्या A1 आणि A2 डब्यांमधून धूर निघताना दिसला. यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. लोको पायलटने हेतमपूर स्टेशनवर ट्रेन थांबवली. पहाटे 3.03 च्या सुमारास ट्रेन हेतमपूर स्थानकावर पोहोचली. ट्रेन थांबताच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
ट्रेनला आग लागल्याची माहिती रेल्वे कंट्रोलला आधीच पोहोचली होती. त्यामुळे मोरेना येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवली. आगीत A1 आणि A2 डबे पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच मुरैना आणि ग्वाल्हेर येथून रेल्वे अधिकारी रवाना झाले. आता आगीचा तपास सुरू आहे. मात्र ट्रेनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कोणतीही जीवित हनी नाही
विशेष म्हणजे या अपघातात रेल्वेतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. दरम्यान ,आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी घाबरून धावत्या ट्रेनच्या खिडक्यांमधून उड्या घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले असून, ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.