Starry Dog Dainik Gomantak
देश

दीड वर्षाच्या चिमुरडी, कुत्र्यांनी टोळी आणि डिजे... कुत्र्यांच्या हल्ल्यात निष्पाप मुलीचा करुण अंत

Ashutosh Masgaunde

Three-four stray dogs attacked and bit an innocent one-and-a-half-year-old girl in which she died, at Tughlaq Road area of Delhi:

दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. येथे भटकी कुत्री रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांवर अचानक हल्ला करून त्यांना जखमी करत आहेत. अनेक वेळा या हल्ल्यात बळीही जातात.

नुकतेच दिल्लीच्या तुघलक रोड भागात रात्रीच्या वेळी असाच काहीसा प्रकार घडला. येथे तीन-चार भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षाच्या निष्पाप मुलीवर हल्ला करत चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तुघलक रोड परिसरात शनिवारी रात्री काही कुत्र्यांनी दिव्यांशी नावाच्या दीड वर्षाच्या मुलीला चावा घेतला. कुत्र्याच्या हल्ल्यातून कुटुंबीयांनी मुलीला सोडवले तोपर्यंत ती जबर जखमी झाली होती.

यानंतर निष्पाप मुलीला सफदरगंज रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

मृत दीड वर्षांची मुलगी दिवंशी ही तुघलक लेनमधील चमन घाट परिसरात कुटुंबासोबत राहत होती. तिचे वडील राहुल कापड छापण्याचे काम करतात.

पीडितेच्या घराबाहेर रात्री कुत्रे फिरत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. ती मुलगी जेवण करून बाहेर आली असताना अचानक कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला.

जवळच एक डीजे वाजत होता, त्या आवाजामुळे मुलीचे ओरडणे कोणालाच ऐकू आले नाही. बराच शोध घेतल्यानंतर घरापासून काही अंतरावर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात सापडली. त्यावेळी तीन कुत्री तिच्या अंगाला चावत होती.

या घटनेनंतर कुटुंबीयांसह स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या मोकाट कुत्र्यांना चारण्यासाठी एक महिला येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तेथे मोकाट कुत्र्यांचा जमाव जमतो. त्यावर रहिवाशांनी आक्षेपही घेतला होता, मात्र त्याची दखल कोणी घेतली नाही आणि याची किंमत एका निष्पापाच्या जीवाने चुकवावी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT