Stray Dog Attack: भटक्या कुत्र्यांना कच्चे मांस खायला घालणाऱ्यांना अटक करा; दाजी साळकरांची मागणी

वाढते शहरीकरण, अन्नाची नासाडी, कचरा आदी कारणांमुळे या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Stray Dog Attack in Goa
Stray Dog Attack in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Stray Dog Attack : गोव्यात भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना काही काळापासून वाढल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. वाढते शहरीकरण, अन्नाची नासाडी, कचरा आदी कारणांमुळे या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Stray Dog Attack in Goa
पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्राचा फेरआढावा कुणाच्या पथ्यावर?

पणजी शहरात एकट्याने पायी चालणे, रत्यावरून दुचाकी घेऊन जाणे कठीण होत असून स्थानिक प्रशासनाने प्रामुख्याने महानगरपालिकेने यासंबंधी गांभीर्याने पावले उचलणे व योग्य निर्णय घेत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध करून मोठ्या प्रमाणात दंड आकारणे गरजेचे आहे. या वाढत्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी भाष्य केले आहे.

दाजी साळकर म्हणाले की, गोव्यात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटना वाढल्या असून ही अतिशय गंभीर बाब आहे. या कुत्र्यांना कच्चे मांस खाऊ घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे असे करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. जर कुणी या भटक्या कुत्र्यांना मांस खायला घालताना दिसला तर त्याला ताबडतोब अटक करण्याचे निर्देशही मी उप-जिल्हाधिकारी आणि पोलिसांना दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी वास्कोमध्ये भटक्या कुत्र्यांच्या एका समूहाने महिलेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात कुत्र्यांनी महिलेच्या हात आणि डोक्यावर गंभीर चावा घेतल्याची माहिती समोर आली होती. महिलेला उपचारासाठी तात्काळ गोमेकॉत दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com