Nupur Sharma Dainik Gomantak
देश

सलमान रश्दींवरील हल्ल्यानंतर Nupur Sharma निशाण्यावर, गुप्तचर यंत्रणा झाल्या सतर्क

Nupur Sharma: अमेरिकेत सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणा नुपूर शर्मांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Nupur Sharma: अमेरिकेत सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणा नुपूर शर्मांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाल्या आहेत. नुपूर शर्मा पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. भारतीय उपखंडातील स्थित अल कायदा (AQIS) ने जूनमध्ये त्यांच्या एका प्रवक्त्यामार्फत निवेदन जारी केले होते. ज्यामध्ये नुपूर यांनी मोहम्मद पैंगबर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा बदला घेण्याबाबत चेतावणी दिली होती.

AQIS ने प्रश्न विचारला

भारतीय उपखंडात स्थित असलेल्या अल कायदाच्या प्रवक्त्याने नुपूर शर्मांच्या (Nupur Sharma) पैगंबरांवरील वक्तव्याचा बदला घेण्यासाठी याआगोदरच चेतावणी दिली आहे. एवढेच नाही तर प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानाचे रक्षण करु शकलो नाही तर आमचा नाश होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) संभल जिल्ह्यातील AQIS प्रमुख असीम उमर यांनी पोस्ट केला होता. यात त्यांनी विचारले की, मोहम्मद पैंगबर यांच्या सन्मानासाठी आपला प्राण देऊ शकेल असा कोणी आहे का?

नुपूर प्रचंड सुरक्षेत आहेत

सध्या नुपूर शर्मांना अज्ञात ठिकाणी पोलीस (Police) कोठडीत ठेवण्यात आले आहे. याशिवाय वाढता धोका पाहता एजन्सींनीही सुरक्षा वाढवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याबद्दल उदयपूर आणि अमरावतीमध्ये (Amravati) यापूर्वीच दोन जणांची हत्या झाली आहे. उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल यांच्या दुकानात घुसून त्यांचा गळा चिरला होता. त्याचवेळी अमरावतीमध्ये केमिस्ट उमेश कोल्हे यांनाही जीवे मारण्यात आले. दोघांनी सोशल मीडियावर नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT