Salman Rushdie: अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. "हिंसा आणि द्वेषाला समाजात स्थान नाही," असे हॅरिस म्हणाल्या आहेत. कमला हॅरिस यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
समाजात द्वेषाला स्थान नाही - हॅरिस
सलमान रश्दी यांना त्यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकावरुन वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर या हल्ल्याचा जगातील अनेक दिग्गज नेत्यांनी निषेध केला. यातच कमला हॅरिस यांनी ट्विट करत म्हटले की, "डग (Husband of Harris) आणि मला या आठवड्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याने धक्का बसला आहे. लोकांना न घाबरता आपण आपले विचार मांडले पाहिजे. समाजात हिंसा आणि द्वेष वाढत आहे."
बायडन यांनी कौतुक केले
त्याचवेळी, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला. रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी त्यांच्या मदतीला धावून आलेल्यांचे कौतुक करताना बायडन म्हणाले की, 'रश्दींच्या मदतीसाठी धावून आलेल्या धाडसी लोकांचा मी आभारी आहे.'
1989 मध्ये रश्दी यांच्या विरोधात फतवा काढण्यात आला होता
सलमान रश्दी हे भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक आहेत. त्यांना अनेक साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहल्ला खामेनी यांनी 1989 मध्ये रश्दी यांच्या हत्येचा फतवा काढला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.