Vladimir Putin  Dainik Gomantak
देश

Vladimir Putin: रशियामध्ये बंड; वॅग्नर समूह पुतीन यांच्यावर उलटला

हजारो बंडखोर सैनिकांनी युद्धाच्या आघाडीवरून थेट राजधानी मॉस्कोच्या दिशेने कूच करायला सुरूवात केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Vladimir Putin युक्रेन गिळंकृत करायला निघालेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर आज त्यांचेच खासगी लष्कर उलटल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भाडोत्री सैनिकांचा समूह असलेल्या ‘वॅग्नर’ समूहाने थेट पुतीन यांनाच आव्हान दिले असून हजारो बंडखोर सैनिकांनी युद्धाच्या आघाडीवरून थेट राजधानी मॉस्कोच्या दिशेने कूच करायला सुरूवात केली आहे.

दुसरीकडे पुतीन यांनी हे बंड म्हणजे देशद्रोह असून देशाशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

रोस्तोवपाठोपाठ व्होरोनेझ हे शहर देखील बंडखोरांच्या हाती लागले असून त्यांचा रोख हा आता राजधानीच्या दिशेने आहे.

रोस्तोवमध्ये नागरिकांनी बंडखोर सैनिकांचे स्वागत केल्याचे चित्र पाहायला मिळाले. या अराजकाच्या पार्श्वभूमीवर मॉस्कोमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत.

काही खासगी विमानांनी मॉस्कोतून सेंट पीटर्सबर्गच्या दिशेने उड्डाण केल्याचे दिसून आले. मार्शल लॉचा भंग करणाऱ्यांना तातडीने ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रोस्तोवमधून बंडखोरांना बाहेर काढण्यासाठी पुतीन समर्थक चेचेन बंडखोर देखील मैदानात उतरले आहेत.

‘वॅग्नर’चे प्रमुख येव्हगिनी प्रिगोझीन यांनी रशियाचे लष्करी नेतृत्व उलथून टाकण्यासाठी आम्ही मॉस्कोच्या दिशेने सैनिक पाठविल्याचा दावा केला आहे.

उठाव चिरडण्याचा पुतीन यांचा इशारा

रशिया स्वतःच्या भविष्यासाठी कडवट संघर्ष करतो आहे. ज्या गोष्टींमुळे आम्ही कमकुवत होऊ त्या सोडायला आम्ही तयार आहोत.

रशियन राष्ट्राच्या भाग्याचा फैसला होऊ लागला असून आम्हाला सर्व सामर्थ्यानिशी सर्वांनी एकत्र येऊन आणि एक होऊन मतभेदांना दूर करायचे आहे, असे व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.

आज आम्हाला ज्या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे तो देशांतर्गत विश्वासघात आहे. आम्हाला रशियाच्या सर्व सैन्यामध्ये ऐक्य हवे आहे. जो कोणी बंडाच्या बाजूने जाईल त्याला दंड केला जाईल. रोस्तोवमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक हितसंबंधांमुळे आमच्यासोबत विश्वासघात झाला आहे. मला मात्र स्वतःच्या लोकांना उत्तर द्यावे लागेल. बंडखोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही व्लादिमीर पुतीन म्हणाले.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने वॅग्नर समूहाच्या बाजूने लढणाऱ्या सैनिकांमध्येही फूट पाडण्याची तयारी चालवली असून येव्हगिनी प्रिगोझीन यांची साथ सोडा आम्ही तुमच्या प्राणाचे संरक्षण करू, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.

युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासूनच प्रिगोझीन यांनी व्लादिमीर पुतीन यांना आव्हान द्यायला सुरुवात केली होती. आमच्या मार्गामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट आम्ही चिरडून टाकू, असे सांगतानाच त्यांनी रशियाचे एक लष्करी हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे.

एफएसबी मैदानात

येव्हगिनी प्रिगोझीन यांना अटक करण्यासाठी रशियाची फेडरल सिक्योरिट सर्व्हिस (एफएसबी) मैदानात उतरली असून मॉस्कोभोवतीचे सुरक्षा कडे अधिक मजबूत करण्यात आले आहे. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोईगू यांना शिक्षा देणे हा आपला उद्देश असल्याचे प्रिगोझीन यांनी म्हटले आहे.

ही तर सुरवात...

वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी रशियाच्या खासगी लष्कराच्या प्रमुखांचे कृत्य हे दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग असल्याचे म्हटले आहे. रशियातील घडामोडींची ही सुरुवात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

या दोन गटांमध्ये फूट पडणार हे स्पष्ट दिसून येत होते, असे अध्यक्ष मायखालो पोदोलयाक यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa T20 Squad: अभिनव तेजराणाकडे टी-20 संघाचे नेतृत्व, अर्जुन तेंडुलकर अजूनही अनफिट; स्नेहल कवठणकरला विश्रांती

Stray Dogs: पेडणे न्यायालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; ज्येष्ठ नागरिकाचा घेतला चावा, न्यायालयात येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

चिमुरडीला कोणीतरी खेचत घेऊन चालला, तेव्हा आपलीच मंडळी त्याला हटकत नव्हती..! म्हापशातील दुर्घटनेने उघडे पाडले समाजाचे सुन्न वास्तव

गोव्यातही सरपंचांची थेट निवड व्हावी!

चिमुकलीवरील अत्याचारामुळे संतापाची लाट; टुगेदर फॉर म्हापसा संघटनेचे पालिकेला निवेदन, सुरक्षा उपायांच्या त्वरित अंमलबजावणी मागणी

SCROLL FOR NEXT