चिमुरडीला कोणीतरी खेचत घेऊन चालला, तेव्हा आपलीच मंडळी त्याला हटकत नव्हती..! म्हापशातील दुर्घटनेने उघडे पाडले समाजाचे सुन्न वास्तव

Mapusa Child Abuse Case: म्हापसा शहरात चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराने गोवेकरांचे मन हेलावले. दुःख व्यक्त झाले.
Mapusa Child Abuse Case
Mapusa Child Abuse CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा शहरात चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराने गोवेकरांचे मन हेलावले. दुःख व्यक्त झाले. म्हापशातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावर जाऊन तंबीही दिली, परंतु त्या चिमुरडीला कोणीतरी खेचत घेऊन चालला, तेव्हा आपलीच मंडळी त्याला हटकत नव्हती..!

म्हापसा शहरात एका चिमुरडीवर झालेला अत्याचार ही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आणि लाजीरवाणी गोष्ट आहे. साऱ्यांनीच या दुर्दैवी घटनेमुळे लाजेने मान खाली घालायला हवी. हे सामूहिक विवेकाचे पतन असून हा केवळ एक अपराध नसून सामाजिक भान हरपल्याचे लक्षण म्हणून त्याकडे पाहायला हवे!

जेव्हा एक लहान बालिका दिवसाढवळ्या, कोणीही हस्तक्षेप न करता एक प्रौढ इसम उजाड इमारतीत ओढून घेऊन जातो, ती घटना लोक उघड्या डोळ्यांनी पाहात राहातात, त्याला हटकत नाहीत! तो कबुलीजबाब ऐकल्यावर कोणाच्याही मनात प्रथमतः प्रश्‍न उद्‍भवेल की, ही एक अधिक गंभीर लाजीरवाणी गोष्ट आहे - आपल्या सामूहिक विवेकाचा हा मृत्यू आहे! आपल्या समाजातील प्रत्येक नागरिक, समुदाय, प्रत्येक शेजारी - या सर्वांचा या घटनेत हातभार लागला आहे. कारण हा अपराध केवळ एक माथेफिरूचा, विकृतीचा नाही, तर हा आपल्या सामूहिक उदासीनतेचा अपराध आहे.

Mapusa Child Abuse Case
Goa Congress RGP Alliance: जागावाटपाबाबत काँग्रेसकडून उशीर, 'आरजी'च्या बारा मतदारसंघांतील प्रमुखांसोबत बुधवारी बैठक

ही उदासीनता आता आपल्या समाजात शिरलेली तर नाही ना? गोव्यातील चारित्र्यात एक नव्या प्रकारच्या विकृतीने शिरकाव केलेला आहे व आपण त्याबाबतीत अनभिज्ञ आहोत किंवा तसे सोंग वठवतो आहोत. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ही घटना घडताना काहीजण उघड्या डोळ्यांनी पाहत होते आणि दुर्लक्ष करत गेले.

अहो! एक बालक उचलले जाते, कोणीतरी माणूस तिला ओढत घेऊन चालला व अनेक लोक अपराधीला पाहात होते, त्याला हटकत नव्हते! अशा गोष्टी सतत घडतात, लोक दुर्लक्ष करतात. घटना घडत राहातात. हा केवळ विकृत माणसाचा अपराध नाही, तर त्या सर्व माणसांचा अपराध आहे जे निरीक्षक बनून राहिले, मूकपणे त्यांनी अपराध घडताना पाहिला! ही उदासीनता एक सामाजिक अपयशाची परिणिती आहे - गोव्यातील चरित्रातील एक विकृती.

Mapusa Child Abuse Case
Goa Ujjwala Scheme: मंत्र्यांचा दणका बसताच अधिकाऱ्यांची धावपळ; 'गोवा उज्ज्वला'च्या अर्जांची चार तालुक्यांत छाननी पूर्ण, बुधवारपासून लाभार्थ्यांना मिळणार पैसे!

एकेकाळी गोवा असा होता - जेथे प्रत्येक बालक गावातील सर्वांचे होते. गावातील कोणीही अनोळखी नव्हता. अलिखित कराराचे समाज होते - सामूहिक देखभालीचे, वैयक्तिक जबाबदारीचे भान होते! आता? आता आपण एक भयानक उदासीनतेच्या संस्कृतीत रूपांतरित झालो आहोत. शहरीकरण - कारण नव्हे, परंतु निमित्त. शहरीकरणाचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत. परंतु हे केवळ आपल्या अमानवीयतेचे कारण नाही. गोवा बदलला आहे. लोकसंख्या वाढली.

अनोळखी चेहरे आमच्या समाजाचे भाग बनले आहेत. आपण त्यांचा भाग आहोत. म्हणून अपराध्यांमध्ये आपणही सामील झालो आहोत. रस्त्यावर अपघात होतात. मारामाऱ्या होतात. साध्या रहदारीच्या, वाहने उभी करून ठेवण्याच्या, चुकीच्या मार्गाने वाहन जाण्यावरून प्रश्‍न उपस्थित होतात. अपघात होऊन माणसे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडतात. समाज माध्यमांवर कोण कोणाला शिव्या देतात. आरोप प्रत्यारोपांची राळ उठते, पण समाजमन त्यांना दटावत नाही. माणुसकीच हरवली आहे. गोवा ज्या दिशेने चालला आहे, त्याला आपण समाज म्हणून जबाबदार नाहीत काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.