Goa T20 Squad: अभिनव तेजराणाकडे टी-20 संघाचे नेतृत्व, अर्जुन तेंडुलकर अजूनही अनफिट; स्नेहल कवठणकरला विश्रांती

Syed Mushtaq Ali Trophy 2026: गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार अभिनव तेजराणा याच्याकडे अपेक्षेनुसार टी-२० संघाचेही नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.
Goa T20 Squad
Goa T20 SquadDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार अभिनव तेजराणा याच्याकडे अपेक्षेनुसार टी-२० संघाचेही नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. संघ १४ नोव्हेंबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या एलिट ‘ड’ गटात कोलकता येथे खेळेल.

प्राप्त माहितीनुसार, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा गोव्याचा मुंबईकर पाहुणा अर्जुन अजूनही अनफिट असल्याने तो चार रणजी सामन्यानंतर आता टी-२० स्पर्धेतही खेळू शकणार नाही. बिहारविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात नाबाद १७८ धावा केलेल्या अनुभवी स्नेहल कवठणकर याला विश्रांती देण्यात आली आहे. रणजी संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर व मध्यमगती विजेश प्रभुदेसाई यांना सतरा सदस्यीय टी-२० संघात संधी मिळालेली नाही.

Goa T20 Squad
Goa Ujjwala Scheme: मंत्र्यांचा दणका बसताच अधिकाऱ्यांची धावपळ; 'गोवा उज्ज्वला'च्या अर्जांची चार तालुक्यांत छाननी पूर्ण, बुधवारपासून लाभार्थ्यांना मिळणार पैसे!

बडोदा संघाविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यानंतर वगळण्यात आलेल्या अष्टपैलू दीपराज गावकर याला टी-२० संघात स्थान मिळाले आहे. तीन रणजी सामन्यांत १६ गडी बाद केलेला युवा ऑफस्पिनर यश कसवणकर याचीही टी-२० संघात निवड झाली आहे. डावखुरा फलंदाज अझान थोटा याने संघात पुनरागमन केले आहे, तर डावखुरा फिरकी गोलंदाज विकास सिंग व फलंदाज ईशान गडेकर हे झटपट क्रिकेटसाठी उपयुक्त खेळाडूही टी-२० संघात परतले आहेत.

गोव्याचा टी-२० संघ

सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा (कर्णधार), दीपराज गावकर, थोटा महंमद अझान, मंथन खुटकर, ललित यादव, यश कसवणकर, दर्शन मिसाळ, विकास सिंग, शिवेंद्र भुजबळ, राजशेखर हरिकांत, वासुकी कौशिक, शुभम तारी, ऋत्विक नाईक, फेलिक्स आलेमाव, हेरंब परब, ईशान गडेकर.

Goa T20 Squad
Goa Congress RGP Alliance: जागावाटपाबाबत काँग्रेसकडून उशीर, 'आरजी'च्या बारा मतदारसंघांतील प्रमुखांसोबत बुधवारी बैठक

गोव्याचे एलिट ‘ड’ गट वेळापत्रक

तारीख १४ नोव्हेंबर : विरुद्ध विदर्भ, तारीख १६ नोव्हेंबर : विरुद्ध उत्तराखंड, तारीख १८ नोव्हेंबर : विरुद्ध मुंबई, तारीख २० नोव्हेंबर : विरुद्ध हैदराबाद, तारीख २२ नोव्हेंबर : विरुद्ध ओडिशा, तारीख २४ नोव्हेंबर : विरुद्ध छत्तीसगड, तारीख २६ नोव्हेंबर : विरुद्ध गुजरात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.