Election Commission |Voting Card
Election Commission |Voting Card Dainik Gomantak
देश

Election Commission चा मोठा निर्णय, आता 17 वयोगटावरील व्यक्तीही करू शकतात मतदार यादीसाठी नोंदणी

दैनिक गोमन्तक

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता 18 वर्ष पूर्ण होण्याची गरज नाही. आता 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार मतदार यादीसाठी नाव नोंदणी करता येईल. तसेच वर्षातून चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे. यासंर्भात गुरुवारी निवडणूक आयोगानं माहिती दिली. 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीत नाव नोंदणी करु शकता. ही मुभा निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. पण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मतदानाचा अधिकार मिळणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. युवकांना, त्यांचे नाव नोंदणीचे अर्ज एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीत दाखल करता यावेत, त्यासाठी त्यांना एक जानेवारीची प्रतीक्षा करायला लागू नये यादृष्टीने तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक उपाय योजावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

यापुढे आता प्रत्येक तीन महिन्यानंतर मतदार यादी अपडेट केल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र तरुण-तरुणींची नाव नोंदणी वेळेवर होणार आहे. नाव नोंदणी केल्यानंतर मतदान ओळखपत्र देण्यात येणार आहे. नव्या मतदारांना एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑटोबरपासून मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज भरता येऊ शकेल. भारतीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 14(b) मधील कायदेशीर सुधारणांच्या अनुषंगाने आणि पर्यायाने मतदार नोंदणी नियम, 1960 मध्ये आवश्यक ते बदल करून विधानसभा किंवा संसदीय मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या तयारी/पुनरिक्षणासाठी आवश्यक बदल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.

मतदार ओळखपत्र – आधार कार्डशी जोडणी
मतदार यादीतील माहिती आणि मतदाराचा आधार (Adhar card) क्रमांक लिंक करण्यासाठी, सुधारित नोंदणी अर्जात मतदारांच्या आधार कार्डाची माहिती विचारण्यात आली आहे. तसेच सध्याच्या मतदारांचा आधार क्रमांक कळावा या उद्देशाने 6बी हा एक नवीन अर्ज देखील सादर करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT